शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
5
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
6
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
7
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
8
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
9
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
10
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
11
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
12
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
13
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
14
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
15
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
16
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
17
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
18
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
19
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
20
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविर काळाबाजारीत पुन्हा चौघांना बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेमडेसिविर काळाबाजार प्रकरणात पोलिसांनी आज सावंगी मेघे (वर्धा) तसेच नागपुरातील शुअरटेक हॉस्पिटलमधील वाॅर्ड बॉयसह ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रेमडेसिविर काळाबाजार प्रकरणात पोलिसांनी आज सावंगी मेघे (वर्धा) तसेच नागपुरातील शुअरटेक हॉस्पिटलमधील वाॅर्ड बॉयसह चाैघांना अटक करून ४ रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले. शनिवारी सायंकाळी जरीपटक्यात या संंबंधाने दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर ठिकठिकाणच्या १५ ते २० जणांची चौकशी सुरू होती. या कारवाईमुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे रुग्णांना सरकारी अथवा खासगी इस्पितळात बेड मिळणे कठीण झाले आहे. बेड मिळाला तर ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि अन्य औषधोपचाराची मारामार आहे. काही इस्पितळातील डॉक्टर परिस्थितीची जाण असूनही रुग्णाच्या नातेवाईकाला रेमडेसिविर बाहेरून आणायचे सांगत आहे. ते मिळाले नाही तर रुग्णाचा जीव धोक्यात येईल, असे सांगत आहे. दुसरीकडे मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची वृत्ती बाळगणारे भामटे रेमडेसिविरचा काळाबाजार करीत आहेत. ४ ते ५ हजारांचे इंजेक्शन २२ ते २५ हजारांत विकत आहेत. ‘मरता क्या न करता’ अशी स्थिती असल्याने रुग्णांचे नातेवाईक तेवढी रक्कम मोजायला तयार असल्यामुळे रेमडेसिविरच्या ब्लॅकमार्केटिंगला जोर चढला होता. या गंभीर प्रकाराची तेवढ्याच गंभीरपणे दखल घेत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी काही इनपूटसह परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त निलोत्पल यांना या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी दिली. त्यानुसार, उपायुक्त निलोत्पल यांनी सापळा रचून डमी ग्राहकाच्या माध्यमातून गुरुवारी सायंकाळी रेमडेसिविरच्या काळाबाजारीत सक्रिय असलेला डॉ. लोकेश शाहू आशा (आशा हॉस्पिटल, कामठी) याला ब्लॅकमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन विकताना रंगेहात पकडले. त्याच्या माहितीवरून वाॅर्डबॉय शुभम मोहदुरे आणि कुणाल कोहळे (स्वस्थम हॉस्पिटल, वर्धा रोड) आणि सुमित बागडे (दत्ता मेघे हॉस्पिटल, वानाडोंगरी) यांनाही बेड्या ठोकल्या. सध्या ते पीसीआरमध्ये असून त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आज वर्धा (सावंगी) येथील दत्ता मेघे हॉस्पिटलचा कर्मचारी सातपुते याला पकडले. त्याने दिलेल्या माहितीनुसार, १५ ते २० जणांची चौकशी सुरू केली.

----

स्वयंकथित पत्रकारासह तिघे जेरबंद

पोलिसांनी केलेल्या या दणकेबाज कारवाईमुळे अनेक पीडितांना दिलासा मिळाला. त्यातील एकाने शुक्रवारी सायंकाळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना एका ब्लॅकमार्केटरची माहिती दिली. ती उपायुक्त नीलोत्पल यांना कळली. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री पुन्हा सापळा रचला. उपायुक्त नीलोत्पल यांच्या विशेष पथकातील एपीआय भिसे, पीएसआय देवकते तसेच जरीपटक्याचे ठाणेदार नितीन फटांगरे यांनी विवेक ढाकणे पाटीलकडे संपर्क साधला. ४६ हजारांत दोन रेमडेसिविर देण्याची तयारी दाखवून हा भामटा मध्यरात्री मार्टीननगरात पोहचला. तेथे पोलीस पथकाने त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून दोन रेमडेसिविर जप्त करण्यात आले. त्याने दिलेल्या माहिवरून नंतर अमन शिंदे तसेच शुअरटेक हॉस्पिटलचा वाॅर्ड बॉय ईश्वर ऊर्फ बिट्टू या दोघांना अटक करून त्यांच्याकडूनही दोन रेमडेसिविर जप्त करण्यात आले. विवेक पाटील नावाचा हा भामटा स्वताला एका न्यूज पोर्टलचा पत्रकार म्हणवून घेतो. त्याची क्रेटा कार, अन्य आरोपींच्या दोन बाईक, मोबाईल्स आणि रोख १३ हजार असा एकूण ६ लाख, ५५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

----

ते १५ रेमडेसिविर जिल्हाधिकाऱ्यांना सोपविले

दरम्यान, गुरुवारी रात्री जप्त करण्यात आलेले १५ रेमडेसिविर पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेऊन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना सोपविले. आणीबाणीच्या काळात ते गरजूंच्या उपयोगात येणार आहेत. पोलिसांच्या या दणकेबाज कारवाईमुळे सर्वत्र काैतुक होत आहे. आणखी अनेक जण कारवाईत अडकण्याचे संकेत पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी दिले आहे.

---