शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

नाते माणुसकीचे!

By admin | Updated: January 1, 2015 01:28 IST

नात्यांचे संदर्भ आता पूर्वीसारखे राहिले नाही़ त्यात आता व्यवहार शिरला आहे़ परंतु काही लोक या व्यवहारी जगातही नात्यांची वीण घट्ट धरून उभे आहेत आणि या लोकांमुळेच हे जग

नागपूर : नात्यांचे संदर्भ आता पूर्वीसारखे राहिले नाही़ त्यात आता व्यवहार शिरला आहे़ परंतु काही लोक या व्यवहारी जगातही नात्यांची वीण घट्ट धरून उभे आहेत आणि या लोकांमुळेच हे जग अजूनही सुंदर भासत आहे़ ऋणाली राऊतसाठी रेल्वेस्थानकावरील कुलींनी जे केले ते या सुंदरतेत भर घालणारेच आहे़ आज ऋणाली आनंदात असली तरी तिचा पूर्वार्ध असा आनंदी नव्हताच़ १० वर्षापूर्वी नागपूर रेल्वेस्थानकावर राजकुमार राऊत नावाचा कुली काम करीत होता. अचानक त्याचा मृत्यू झाला. यावेळी त्याची पत्नी ऋणालीला दीड वर्षाची मुलगी होती. तिच्या सासरच्या मंडळींनी मदत करण्याऐवजी तिला त्रास दिला. अशा वेळी तिने धुणीभांडी करून आपले आणि आपल्या मुलीचे पालनपोषण केले. सर्व कुली बांधव तिला नेहमीच भेटून आर्थिक मदत करायचे. रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून सर्व कुली बांधवांनी ऋणालीला तिच्या पतीचा कुलीचा बिल्ला मिळवून दिल्याचे सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष माजीदभाई यांनी सांगितले. कुली बांधवांनी मदत केली नसती तर आपण कधीच या जगाचा निरोप घेतला असता, अशी भावना ऋणालीने व्यक्त केली. आठ दिवसांपासून ती कुली बांधवांच्या खांद्याला खांदा लावून रेल्वेस्थानकावर कुलीचे काम करीत आहे. एखादा कुली आजारी असला. कुठल्याही वैयक्तिक अडचणीत सापडला की रेल्वेस्थानकावरील इतर कुली जात-पात, धर्म न पाहता त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. जाती-धर्माच्या नावावर रक्तपात सुरू असताना नागपूर रेल्वेस्थानकावरील कुलींचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असेच त्यांचे कार्य आहे. हिंदू, मुस्लीम, बौद्ध अशा सर्वच जाती धर्मातील १५५ कुली बांधव येथे गुण्या गोविंदाने काम करीत आहेत. मुस्लीम बांधवांचा मोहर्रम असो, बौद्ध बांधवांचा १४ एप्रिल, धम्मचक्र प्रवर्तन दिन असो, सर्वच कुली एकत्र येऊन तो साजरा करतात. एखादा कुली अडचणीत असल्याचे समजताच सर्व कुली त्याच्या मदतीला धावून जातात. रेल्वेस्थानकावरील कुलींची ही एकता पाहून जाती धर्माच्या नावाखाली हिंसाचार घडवून आणणाऱ्या समाजकंटकांनी या कुलींपासून धडा घेण्याची गरज आहे.