शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाचा विक्रम, एका दिवसात ४१,७२१ जणांना डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारने आखलेल्या नव्या धोरणानुसार व राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर जिल्ह्यात १८ वर्षावरील लसीकरणाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्र सरकारने आखलेल्या नव्या धोरणानुसार व राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर जिल्ह्यात १८ वर्षावरील लसीकरणाला बुधवारी उत्साहात सुरूवात झाली. नागपूर जिल्ह्यात एकूण ४१ हजार ७२१ नागरिकांना डोस देण्यात आले. शहरात २३ हजार ७०३ हजार तर ग्रामीण भागात १८ हजार १८ जणांना डोस देण्यात आला. सर्वाधिक लसीकरणाचा हा नागपूर जिल्ह्यातील विक्रम आहे.

मनपा व शासकीय रुग्णालयाच्या १०६ केंद्रांवर २२ हजार २२१ जणांना तर खासगी केंद्रावर १ हजार ४८२ जणांना डोस देण्यात आले. कोविड प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी तरुणांमध्ये चांगलाच उत्साह दिसून आला. अनेक केंद्रावर युवकांनी लस घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. शासनाच्या सर्व केंद्रावर लस मोफत दिली जात आहे.

सर्व लसीकरण केन्द्र सकाळी ११ ते संध्याकाळी ५ पर्यंत सुरु राहतील. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येते. सध्या महापालिका आणि अन्य शासकीय केंद्र मिळून १०६ केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर तीन केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असल्याची अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. तसेच ड्राइव्ह इन व्हॅक्सीनेशन केंद्रावरसुद्धा १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यत लसीकरण केले जात आहे.

युवकांनी नोंदणी करुन आपला वेळ निश्चित करावा. निर्धारित वेळेत केंद्रावर जाऊन लसीकरण करुन घ्यावे. तसेच कोरोना नियमांचे पालन करावे. तिसरी लाट येण्यापूर्वी सर्व नागरिकांचे लसीकरण झाले पाहिजे या उद्देशाने १०६ केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले. त्यांनी बजेरिया येथील राजकुमार गुप्ता समाज भवन केंद्राला भेट देऊन पाहणी केली.

आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सुद्धा या वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे. लसीकरण केल्यानंतर सुद्धा मास्क वापरणे, हात धुणे व सामाजिक अंतर ठेवणे या कोविड विषयक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

....

तीन केंद्रावर कोव्हॅक्सिन

४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज),डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व महाल येथील मनपाच्या स्व. प्रभाकर दटके रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध आहे. ज्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व स्व.प्रभाकर दटके रोग निदान केन्द्र येथे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी त्यांना ऑनलाईन नोंदणीचा पर्याय उपलब्ध आहे.

.....

२० हजार डोस शिल्लक

बुधवारी ४५ डोस उपलब्ध होते. यातील २५ हजार डोस देण्यात आले. गुरुवारसाठी २० हजार डोस शिल्लक असल्याची माहिती मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दिली. शुक्रवारपर्यंत पुन्हा डोस मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु डोस उपलब्ध न झाल्यास लसीकरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.