शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

‘चिमणीचं मत कुणाला’ वास्तववादी प्रयोग

By admin | Updated: September 18, 2014 00:46 IST

बुद्धिजीवी नाट्य रसिकांना आकर्षित करणाऱ्या भाजपा सांस्कृतिक आघाडी व संजय भाकरे फाऊंडेशनतर्फे आयोजित प्रायोगिक रंगभूमी चळवळीने सध्या चांगलेच बाळसे भरले आहे. या मासिक नाट्य

संजय भाकरे फाऊंडेशनची निर्मिती : नवोदितांचा सकस अभिनय नागपूर : बुद्धिजीवी नाट्य रसिकांना आकर्षित करणाऱ्या भाजपा सांस्कृतिक आघाडी व संजय भाकरे फाऊंडेशनतर्फे आयोजित प्रायोगिक रंगभूमी चळवळीने सध्या चांगलेच बाळसे भरले आहे. या मासिक नाट्य सादरीकरण उपक्रमांतर्गत एका वेगळ्या विषय आणि आशयाच्या ‘चिमणीचं मत कुणाला?’ या एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले. हा प्रयोग साईकृपा मंगल कार्यालय, रहाटे चौक येथे सादर करण्यात आला. या वास्तववादी नाट्यप्रयोगाने रसिकांना अंतर्मुख केले. या नाटकाचे लेखन विवेक गरुड यांनी केले होते. संजय भाकरे आणि कुणाल गडेकर निर्मित या प्रयोगाचे कुशल दिग्दर्शन मंगेश बावसे व अबोली केळकर यांचे होते. यात मंगेश बावसे, आदित्य धुळधुळे, सुवर्णा बोरकर, डॉ. स्मिता माहूरकर, अक्षय जोशी, मधुरा माने, अभय देशमुख, केतकी कुळकर्णी आदींनी भूमिका साकारली. या सर्व कलावंतांना ज्येष्ठ दिग्दर्शक गजानन पांडे यांचे मार्गदर्शन लाभले. रसिकांना विचार देणारे आणि अंतर्मुख करणारे हे सादरीकरण होते. मराठी रंगभूमीवर सामाजिक आणि वैचारिक प्रबोधन घडविणाऱ्या या नवप्रवाहाला उपस्थितांचा उत्तम प्रतिसाद लाभला. नाटक हा एक सकस कलाप्रकार आहे. केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करावे, एवढाच सीमित उद्देश न ठेवता प्रस्थापित शासनप्रणालीतील व्यवस्थेबद्दल रसिकांना सजग करणारा हा प्रयोग होता. प्रचलित निवडणूक प्रक्रियेतील उणिवांवर ताशेरे ओढणारे हे नाट्य होते. लोकशाही शासन प्रणालीत राजसत्तेचे परिवर्तन घडविणाऱ्या या सशक्त निवडणूक प्रक्रियेबद्दलची उदासिनता व तळागाळातील नागरिकांना निवडणूक यादीतून वगळून त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून उदासिनतेला एका चिमणीच्या माध्यमातून संवेदनतेने सादर करण्यात आले. आपल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य टिकविण्यासाठी आज डोळस व व्यापक मतदानाची नितांत गरज आहे. त्यादृष्टीनेही उपेक्षित मतदारांच्या उद्वेगाला वाचा फोडणारे एका व्यापक विषयावरील नेटक्या सादरीकरणाचे हे वास्तववादी नाट्य होते. सर्वच कलावंतांनी ताकदीने सादरीकरण करून हा विषय यशस्वीपणे रसिकांपर्यंत पोहोचविला. याप्रसंगी स्वरगंधा पुरस्काराने प्रसिद्ध संगीतकार मोरेश्वर निस्ताने आणि प्रतिभावंत गायिका श्रुती जैन यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला सुधाकर बावसे, दिलीप ठाणेकर, नारायण जोशी, रश्मी फडणवीस, चेतना टांक प्रामुख्याने उपस्थित होते. सचिन गिरी, सम्राज्ञी वैद्य, अनिता भाकरे, दिलीप देवरणकर, केयूर भाकरे, विशाल यादव, मकरंद भालेराव यांनी नाटकासाठी महत्त्वाचे योगदान दिले. (प्रतिनिधी)