शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक परिवर्तनासाठी समाजापर्यंत पोहोचणार

By admin | Updated: June 29, 2015 03:05 IST

देशातील शिक्षणप्रणालीत भारतीय पारंपरिक मूल्यांचा समावेश करण्यात यावा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे.

योेगेश पांडे  नागपूरदेशातील शिक्षणप्रणालीत भारतीय पारंपरिक मूल्यांचा समावेश करण्यात यावा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे. यासाठी संघ परिवारातील संघटना कामाला लागल्या आहेत. शैक्षणिक परिवर्तनाची गरज समाजापर्यंत पोहोचावी व समाजमन तयार व्हावे यासाठी संघप्रणीत भारतीय शिक्षण मंडळातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मंडळाने तयार केलेला आराखड्याला समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी जुलै महिन्यात राष्ट्रीय स्तरावर ‘अभिमत मोहीम’ राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. समाजात संघाची पाळेमुळे मजबूत करायची असेल तर सामाजिक क्षेत्रासोबतच शिक्षणक्षेत्राकडेदेखील विशेष लक्ष देण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत याचेच प्रतिबिंब दिसून आले. पारंपारिक मूल्यांचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा अशी भूमिका प्रतिनिधींनी यावेळी मांडली होती. पारंपरिक मूल्यांसोबतच कौशल्यावर आधारित शिक्षणावर भर द्यायला हवा अशी सूचना करण्यात आली होती. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनीदेखील ‘केजी ते पीजी’पर्यंतचे शिक्षण एकाच धोरणाखाली आणण्याची गरज वेळोवेळी व्यक्त केली आहे.शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय शिक्षण मंडळाने देशातील शैक्षणिक परिवर्तनासाठी अनेक शिक्षणतज्ज्ञांची मदत घेऊन शिक्षणाचा आराखडा तयार केला आहे. विद्यापीठ, माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाचा एकमेकांशी संबंध प्रस्थापित करणे, व्यापक परंतु सर्वसमावेशक अभ्यासक्रम लागू करणे, संशोधन पद्धतीत बदल आणणे, भारतीय मूल्यांचा समावेश इत्यादी मुद्यांचा या आराखड्यात समावेश आहे या आराखड्यावर देशात विविध स्तरांवर चर्चा व्हायला हवी अशी मंडळाची भूमिका आहे. या आराखड्यावर मंडळातर्फे देशभरात विविध परिसंवाद व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्ष समाजापर्यंत हा आराखडा पोहोचावा व त्यातून समाजाला अपेक्षित असणाऱ्या आणखी बाबी समोर यावा यासाठी ‘अभिमत मोहीम’ राबविण्यात येणार आहे. १२ ते १६ जुलै या कालावधीत भारतीय शिक्षण मंडळ अभिमत संग्रह करणार आहे. डॉक्टर, इंजिनिअर, शेतकरी, वकील, व्यापारी,शिक्षक, विद्यार्थी, पालक, संस्थाचालक यांच्यासोबत जास्तीत जास्त प्रमाणात नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा मंडळाचा प्रयत्न राहणार आहे. या मोहिमेदरम्यान नागरिकांना ‘फिडबॅक फॉर्म’ देण्यात येणार असून त्यांच्या सूचना गोळा करण्यात येणार आहेत. या सूचनांचा समावेश करुन संबंधित आराखडा २०१६ या वर्षात केंद्र शासनाला सोपविण्यात येणार आहे.