शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Ramdas Athawale : उसका नाम है शशी..; आता थरुर यांच्यावरही आठवलेंची भन्नाट कविता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 17:03 IST

रामदास आठवलेंनी थरूर यांना इंग्रजीत स्पेलिंग योग्य लिहिण्याचा सल्ला दिला. उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या शशी थरूर यांना इंग्रजीवरील प्रभुत्वासाठी ओळखले जाते

नागपूर - फर्ड्या इंग्लिशसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे खासदार शशी थरूर आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यात मजेशीर ट्विट वॉर रंगले. एकीकडे शशी थरूर यांनी लोकसभेतील एक फोटो शेअर करून रामदास आठवलेंचा उल्लेख केला. तर काही वेळाने रामदास आठवलेंनी पलटवार करत शशी थरुर यांची शाळा घेतली. त्यानंतर, आज नागपूर येथील पत्रकार परिषदेत थरुर यांनी पुन्हा एकदा थरुर यांची मजा घेतली. विशेष म्हणजे थरुर यांच्यावर कविताच केली.

रामदास आठवलेंनी थरूर यांना इंग्रजीत स्पेलिंग योग्य लिहिण्याचा सल्ला दिला. उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या शशी थरूर यांना इंग्रजीवरील प्रभुत्वासाठी ओळखले जाते. तसेच त्यांच्या इंग्रजीसमोर भलेभले निरुत्तर होतात, मात्र यावेळी रामदास आठवलेंनी इंग्रजीवरून थरूर यांची कोंडी केली. रामदास आठवलेंचा हा कॉन्फिडन्स अनेकांना भावला. विशेष म्हणजे नागपूर येथील पत्रकार परिषदेतही आठवलेंनी पुन्हा एकदा शशी थरूर यांच्यावर निशाणा साधला. आठवलेंनी आता थरुर यांच्यावर कविताच केली. 

जिसकी इंग्लिश मैने ट्विटरपर देखीउनका नाम है शशीउनका बयान दे खकर मुझको आती हँसी

अशी कविता आठवलेंनी केली. त्यामुळे, आठवले आणि थरुर यांच्यातील हा मिश्कीलपणा सध्या नेटीझन्सला मजेशीर वाटत आहे. 

थरुर यांचा मिश्कील चिमटा

शशी थरूर यांनी गुरुवारी लोकसभेतील एक फोटो ट्विट केला आहे. त्यामध्ये केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन ह्या अर्थसंकल्पाबाबतच्या प्रश्नांना उत्तरं देताना दिसत आहेत. तर त्यात दिसत असलेले रामदास आठवले यांच्या चेहऱ्यावरील भावांवरून थरूर यांनी अर्थसंकल्पावर निशाणा साधला. ते म्हणाले की, सुमारे दोन तासांच्या ‘Bydget debate’ वर अवलंबून राहिल्यानंतरही रामदास आठवलेंच्या चेहऱ्यावरील स्तब्ध आणि अविश्वसनीय भाव सांगतात की, ट्रेजरी बेंचसुद्धा वित्तमंत्र्यांकडून अर्थव्यवस्था आणि अर्थसंकल्पाबाबत केलेल्या दाव्यांवर विश्वास ठेवू शकत नाही आहेत.

आठवलेंचा रिप्लाय, थरुरांचा कुबली

रामदास आठवले यांनीही शशी थरूर यांना उत्तर दिले आणि त्यांना चुकीचा लिहिलेला Bydget शब्द सुधारण्याचा सल्ला दिला. त्यांनी लिहिले की, प्रिय शशी थरूर जी विनाकारण दावे आणि विधाने करताना चुका होणं साहजिक आहेत. मात्र ही जुगलबंदी इथेच थांबली नाही. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना नंतर शशी थरूर यांनीही उत्तर देत आपली चूक मान्य केली. त्यांनी सांगितले की, टायपिंगमधील चुकीमुळे असे झाले. त्यांनी सांगितले की, चुकीचे टायपिंग हे वाईट इंग्रजीपेक्षा मोठे पाप आहे. 

काँग्रेसमुळेच देशात गरिबी

देशात फक्त काँग्रेसमुळे गरिबी असल्याची टीकाही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. गरीबी हटाव असा नारा इंदिरा गांधीनी दिला होता, पण त्या नाऱ्याचा काही फायदा नाही असेही ते म्हणाले. आज ते नागपुरात आले असता माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील गरिबी, जातीयवाद, बेरोजगारीसाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचे म्हटले. तर, पंतप्रधान मोदी यांनी संसदेत काँग्रेसचा इतिहास मांडला. भाजपने अनेक योजना केल्या होत्या. त्याचा फायदा अनेक लोकांना मिळाला. चांगले काम केले असते तर नरेंद्र मोदी सत्ते वर आले नसते,  असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरRamdas Athawaleरामदास आठवलेTwitterट्विटरnagpurनागपूर