Rains : विदर्भात पुढचे तीन दिवस धोक्याचे; ‘माेंथा’ चक्रीवादळाच्या संकटाने 'या' जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 20:06 IST2025-10-27T20:03:56+5:302025-10-27T20:06:29+5:30
Nagpur : नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांत गुरुवारी व शुक्रवारी मध्यम वेगाने अवकाळी पावसाने हजेरी लावली हाेती. या अवकाळी पावसाचा नागपूर, भंडारा व गडचिराेली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फटका बसला.

The next three days are dangerous in Vidarbha; Due to the threat of Cyclone 'Montha', heavy rains are likely in these districts
Vidarbha Rain : बंगालच्या उपसागरात अतितीव्र कमी दाब क्षेत्राचे रविवारी रात्री चक्री वादळात रूपांतर झाले आहे. या चक्रीवादळाचे ‘माेंथा’ असे नामकरण करण्यात आले असून, त्याच्या प्रभावाने संपूर्ण विदर्भात पुढचे तीन दिवस २८, २९ व ३० ऑक्टाेबरदरम्यान जाेरदार पाऊस हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
नागपूरसहविदर्भातील काही जिल्ह्यांत गुरुवारी व शुक्रवारी मध्यम वेगाने अवकाळी पावसाने हजेरी लावली हाेती. या अवकाळी पावसाचा नागपूर, भंडारा व गडचिराेली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फटका बसला. अनेक शेतकऱ्यांचे धानाचे कापलेले कडपे मातीत मिसळले. साेयाबीनच्या दाण्यांवर ओलावा आल्याने नुकसान झाले आहे. दरम्यान शनिवारी, रविवार व साेमवारीही ढगाळ वातावरण असले तरी पावसाने उघडीप दिली आहे. शुक्रवारच्या पावसामुळे नागपूरचा पारा २४ तासांत ७ अंशांनी खाली घसरत २६ अंशावर पाेहचला हाेता. मात्र, उघडीपीमुळे त्यात पुन्हा वाढ झाली असून, साेमवारी ३१ अंशांची नाेंद झाली.
दरम्यान रविवारी रात्री बंगालच्या उपसागरात माेंथा चक्रीवादळ तयार झाले आहे. मंगळवारी २८ ऑक्टाेबरला माेंथाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर हाेणार असून ते आंध्र प्रदेशातील 'काकीनाडा' शहराजवळील किनारपट्टी वरून भू-भागावर आदळण्याची शक्यता जाणवते. तेथून पुढे उत्तर दिशेने ते प्रथम ओडिशा व नंतर छत्तीसगडकडे सरकेल. काही प्रणाल्यांमुळे या माेंथा वादळास वाढीव ऊर्जा मिळत असल्यामुळे त्याच्या तीव्रतेत वाढ होत आहे. जेव्हा 'मोंथा' छत्तीसगडमध्ये प्रवेशित होईल, तेव्हा संपूर्ण विदर्भात ३० ऑक्टोबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता जाणवते. त्याच्या परिणामातून मराठवाड्यातही त्या तीन दिवसांत तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जाणवते. त्यातही विशेषतः विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांत अती जोरदार पावसाची शक्यता जाणवते. या पावसानंतर थंडीत वाढ हाेऊ शकते, असा अंदाजही हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला.