शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पावसाने सरासरी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 19:40 IST

सप्टेंबर महिना लागताच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण जलाशये ओव्हरफ्लो झाली. नागपुरात वर्षभरात जितका पाऊस होतो. त्याची सरासरी आताच ओलांडली . आतापर्यंत नागपुरात १०८१.७ मि.मी. इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवर्षभराची सरासरी १०७४ मि.मी. , आतापर्यंत पडला १०८१ मिमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑगस्ट महिन्यापर्यंत पावसाच्या लहरीपणामुळे यंदा पावसाचा बॅकलॉग भरेल की नाही, असे वाटत होते. भर पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामनाही करावा लागला इतकी परिस्थिती भयावह होती. परंतु सप्टेंबर महिना लागताच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण जलाशये ओव्हरफ्लो झाली. इतकेच नव्हे तर नागपुरात वर्षभरात जितका पाऊस होतो. त्याची सरासरी आताच ओलांडली आहे. आतापर्यंत नागपुरात १०८१.७ मि.मी. इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. हवामान विभागानुसार सप्टेंबर महिन्याच्या उर्वरित दिवसात आणखी पावसाची शक्यता आहे.यावर्षी मान्सूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने ज्या प्रकारे दडी मारली त्यामुळे यावर्षी पुरेसा पाऊस होणार नाही, असेच वाटत होते. जलाशये कोरडी राहतील आणि उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागेल, अशी शक्यताही वर्तविली जात होती. परंतु सप्टेंबर महिन्यातील तिसरा आठवडा नागपूरकरांसाठी महत्त्वाचा ठरला. या आठवड्यात इतका पाऊस झाला की, नागपूरसह विभागातील सर्वच महत्त्वाची जलाशये ओव्हरफ्लो झाली. नागपूर शहरात संपूर्ण पावसाळ्यात सरासरी १०७४ मि.मी. इतका पाऊस होतो. परंतु १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता नागपुरात सरासरी १०८१.७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत सरासरीपेक्षा ७.७. मि.मी. अधिक पाऊस नागपुरात झालेला आहे. हवामान विभागानुसार येणाऱ्या काही दिवसात आणखी चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा किती अधिक पाऊस होतो, हे पाहावे लागणारऑगस्ट-सप्टेंबरपासून दिलासाविशेष म्हणजे यंदा नागपुरात सरासरी १०७४ इतका पाऊस पडेल, असे कुणालाच वाटले नाही. सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याने सर्वच चिंतेत होते. दरम्यान ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने जोर धरला. त्यामुळे नागपुरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊ शकला.