उन्हाळ्यात पावसाळा, दिवसाचा पारा घसरला रात्रीचा उसळला; १९ पर्यंत वातावरण असेच..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 12:22 PM2023-03-17T12:22:49+5:302023-03-17T12:27:15+5:30

सकाळ-सायंकाळी थेंबे थेंबे, दिवसभर उष्णता

Rainfall in summer, the mercury fell during the day and rose during the night | उन्हाळ्यात पावसाळा, दिवसाचा पारा घसरला रात्रीचा उसळला; १९ पर्यंत वातावरण असेच..

उन्हाळ्यात पावसाळा, दिवसाचा पारा घसरला रात्रीचा उसळला; १९ पर्यंत वातावरण असेच..

googlenewsNext

नागपूर : गत दोन दिवसापासून उन्हाळ्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. नागपूरसह पूर्व विदर्भात जाेराचा पाऊस झाला नाही पण अमरावती विभागात चांगल्या सरी बरसल्या. ढगाळ वातावरण असल्याने दिवसाच्या तापमानात ५ ते ९ अंशांची माेठी घसरण झाली आहे पण रात्रीचा पारा उसळल्याचे दिसून येत आहे.

बुधवारप्रमाणे गुरुवारीही नागपुरात सकाळपासूनच आकाशात ढगांनी गर्दी केली हाेती. सकाळपासून ढगांमधून थेंब थेंब सुरू हाेती. त्यानंतर दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू हाेता. त्यामुळे काहीसा उकाडा जाणवत हाेताच. दिवसभर ०.४ मि.मी. पावसाची नाेंद झाली. ढगाळ वातावरणामुळे दिवसाचा पारा २४ तासांत ५.३ अंशांनी घसरला व ३० अंशांची नाेंद झाली, जी सरासरीपेक्षा ५.८ अंशाने कमी आहे. दरम्यान, रात्रीचा पारा मात्र वधारला आहे. रात्रीचे तापमान २४ तासांत ३.२ अंशांनी उसळले व २१.४ अंशांची नाेंद झाली, जी सरासरीपेक्षा २.१ अंशाने अधिक आहे. पूर्व विदर्भातील वर्धा, गाेंदिया, गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्यातही दिवसाची घसरण व रात्री पारा उसळला आहे.

अमरावती विभागात चांगला पाऊस झाला. अमरावतीत ५.२ मि.मी., अकाेल्यात ६.२ मिमी. व बुलढाण्यात २ मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे दिवसाच्या तापमानात ७ ते ९ अंश आणि रात्रीच्या पाऱ्यात ३ ते ४ अंशांची घसरण नाेंदविण्यात आली.

दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भात १९ मार्चपर्यंत असेच पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. २४ तासांत विजा व ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस हाेण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र २४ तासांत संपून वातावरण पूर्ववत हाेण्याचा अंदाज आहे.

Web Title: Rainfall in summer, the mercury fell during the day and rose during the night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.