विदर्भात पुन्हा पावसाळी ढग ! ३० मार्चपासून चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना बसणार फटका

By निशांत वानखेडे | Updated: March 28, 2026 19:44 IST2026-03-28T19:43:16+5:302026-03-28T19:44:07+5:30

Nagpur : विदर्भात पुन्हा पावसाळी वातावरण तयार हाेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या ३० मार्चपासून चार दिवस आकाशात अवकाळी पावसाचे ढग जमा हाेत वादळासह गारपीट हाेण्याचीही शक्यता आहे.

Rain clouds again in Vidarbha! Unseasonal rain likely for four days from March 30, 'these' districts will be hit | विदर्भात पुन्हा पावसाळी ढग ! ३० मार्चपासून चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना बसणार फटका

Rain clouds again in Vidarbha! Unseasonal rain likely for four days from March 30, 'these' districts will be hit

नागपूर :विदर्भात पुन्हा पावसाळी वातावरण तयार हाेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या ३० मार्चपासून चार दिवस आकाशात अवकाळी पावसाचे ढग जमा हाेत वादळासह गारपीट हाेण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे तापलेले वातावरण पुन्हा थंड हाेण्याची शक्यता असली तरी वादळाचा तडाखा व गारपीटीममुळे शेतातील पिकांना नुकसान हाेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ढगाळ वातावरणामुळे काही दिवस दिलासा दिल्यानंतर सूर्याचा प्रकाेप पुन्हा वाढला. शुक्रवारी ४०.६ अंशाच्या या सिजनच्या सर्वाेच्च स्तरावर गेलेल तापमान शनिवारी अंशत: कमी झाले असले तरी ४० अंशाचा ताप कायम हाेता. नागपूरसह चंद्रपूर, ब्रम्हपुरी, वर्धा, वाशिम येथे पारा ४० अंशाच्या वर आहे. दुसरीकडे सर्वाधिक ४१.२ अंशाची नाेंद अकाेल्यात व त्याखाली ४१ अंशाची अमरावतीत नाेंद झाली. त्यामुळे दिवसभर उन्हाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. सायंकाळच्या सुमारास नागपुरात आकाशात ढगांची गर्दी जमली हाेती, त्यामुळे काहीसा गारवा निर्माण झाला. मात्र उकाड्याचा त्रास पुढचे २४ तास कायम राहणार आहे.

३० मार्च ते ३ एप्रिलपर्यंत विदर्भात काही जिल्ह्यात आकाश ढगांनी व्यापलेले राहण्याची शक्यता आहे. यासह वादळवारे व गारपीट हाेण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागपूरसह गडचिराेली, अमरावती व अकाेल्यात ३० मार्चपासून, वर्धा, चंद्रपूर, बुलढाणा व यवतमाळला ३१ मार्चपासून, तर गाेंदिया, भंडारा, वाशिम येथे १ व २ एप्रिल राेजी पावसाळी वातावरण तयार हाेईल, असा अंदाज आहे. ३० मार्चला गारपीट हाेण्याचा अंदाज आहे. वादळ व गारपीटीमुळे शिकस्त घरे, झाेपड्या व पिकांनाही नुकसान हाेण्याचा इशारा दिला आहे.

Web Title : विदर्भ में फिर बारिश: मार्च अंत तक बेमौसम बारिश की आशंका

Web Summary : विदर्भ में 30 मार्च से चार दिनों तक बेमौसम बारिश की आशंका है। नागपुर, अकोला, अमरावती और गढ़चिरौली में तूफान और ओलावृष्टि की संभावना है, जिससे फसलों और संपत्तियों को नुकसान हो सकता है। बारिश से पहले तापमान अधिक रहेगा।

Web Title : Vidarbha Braces for Rain: Unseasonal Showers Expected Late March

Web Summary : Vidarbha anticipates unseasonal rain from March 30th for four days. Storms and hailstorms are likely in Nagpur, Akola, Amravati, and Gadchiroli, potentially damaging crops and properties. Temperatures remain high before the expected rainfall.