शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतील प्रवाशाचा मृत्यू

By admin | Updated: November 1, 2015 03:24 IST

सुरक्षा आणि वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने १८२ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.

तामिळनाडू एक्स्प्रेस ‘लेट’ : वेळीच उपचार मिळाला नाहीनागपूर : सुरक्षा आणि वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने १८२ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. परंतु एखादा प्रवासी एकटाच प्रवास करीत असेल आणि त्याची प्रकृती बिघडल्यास त्याच्यावर लक्ष पुरविण्यात येत नाही. त्यामुळे शनिवारी एका प्रवाशाचा वेळीच उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली.१२६२२ तामिळनाडू एक्स्प्रेसने (कोच एस-१) एक प्रवासी प्रवास करीत होता. तो बराच वेळापासून बेशुद्धावस्थेत पडून होता. परंतु तो काहीच हालचाल करीत नसल्यामुळे सहप्रवाशांना बऱ्याच वेळानंतर शंका आली. त्यांनी गाडीतील टीटीईला याबाबत सूचना दिली. त्यानंतर टीसीने नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी येण्यापूर्वी उपस्टेशन व्यवस्थापकांना कळविले. उपस्टेशन व्यवस्थापकांनी लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे डॉक्टरांना पाचारण केले. तामिळनाडू एक्स्प्रेस दुपारी ३ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर आली. त्यानंतर रेल्वेच्या डॉक्टरांनी या प्रवाशाला तपासून मृत घोषित केले. लोहमार्ग पोलिसांनी या प्रवाशाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविला. संबंधित प्रवाशाला वेळीच उपचार मिळाले असते तर त्याचा जीव वाचला असता. परंतु त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीय प्रवास करीत नसल्यामुळे हेल्पलाईनवर कोणीच संपर्क साधला नाही. त्यामुळे असा एकटा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीही रेल्वे प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे. संबंधित प्रवाशाची ओळख पटू शकली नाही. या घटनेमुळे तामिळनाडू एक्स्प्रेसला २० मिनिटे विलंब झाला. (प्रतिनिधी)