शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे क्वॉर्टरच्या दारुअड्ड्यावर धाड

By admin | Updated: August 5, 2015 02:30 IST

अजनीच्या रेल्वे क्वॉर्टरमध्ये दारूचा अड्डा सुरू असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच पोलीस आणि आरपीएफच्या अधिकाऱ्यांत खळबळ निर्माण झाली.

दणका लोकमतचा

आरपीएफ अन् पोलिसांत खळबळ :  आरोपी भलावीस घेतले ताब्यात नागपूर : अजनीच्या रेल्वे क्वॉर्टरमध्ये दारूचा अड्डा सुरू असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच पोलीस आणि आरपीएफच्या अधिकाऱ्यांत खळबळ निर्माण झाली. एकीकडे आरपीएफचे पथक या अड्ड्यावर कारवाईसाठी पोहोचले तर, त्यापूर्वीच अजनी ठाण्याच्या पोलिसांनी कारवाईची तत्परता दाखविली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दारु विक्रेता मनोज भलावी यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ‘रेल्वे क्वॉर्टरमध्ये दारूअड्डा’ या मथळ्यातील वृत्त लोकमतने बुधवारी प्रकाशित केले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, कारवाईचे संकेत मिळाल्यामुळे पोलीस पोहोचण्यापूर्वीच दारू विक्रेत्याने तेथून मोठा साठा हलविला. दरम्यान, कारवाईसाठी आरपीएफचे पथक पोहोचण्यापूर्वीच तेथे अजनी पोलीस पोहोचले. पोलिसांना तेथे केवळ ३२० रुपयांची दारू मिळाली. त्यांनी दारू तसेच अड्डा चालविणाऱ्याला ताब्यात घेत पोलीस ठाणे गाठले. त्याचमुळे आरपीएफच्या पथकाला रिकाम्या हाती परतावे लागले. दरम्यान, लोकमतचे वृत्त वाचून आपण सहायक मंडळ आयुक्त संजय चौधरी यांना कारवाईचे आदेश दिल्याची माहिती आरपीएफचे वरिष्ठ कमांडंट ज्योतिकुमार सतीजा यांनी दिली. आरपीएफचे पथक घटनास्थळी गेले होते. मात्र, तत्पूर्वीच अजनी पोलिसांनी दारू अड्डा चालकाला अटक केल्याचे सांगून अशाप्रकारच्या कोणत्याही गैरकृत्याची नागरिकांनी तक्रार केल्यास तात्काळ दखल घेतली जाईल, असेही सतीजा म्हणाले. त्यांनी गैरप्रकार उघड केल्याबद्दल लोकमतचे अभिनंदन करून धन्यवादही दिले; सोबतच रेल्वे वसाहतीत अशाप्रकारचे गैरप्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नसल्याचेही ठासून सांगितले.(प्रतिनिधी)कसून चौकशी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आम्ही त्याची तात्काळ दखल घेत कारवाईचे आदेश दिले. त्याचमुळे पोलीस पथकाने अड्ड्यावर धडक दिली. मात्र, केवळ ३२० रुपयांचीच दारू पोलिसांच्या हाती लागली. तथापि, दारू विक्रेत्याची कसून चौकशी सुरू असून, यापुढे असे काही घडल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अजनीचे ठाणेदार एस.डी. महाडिक यांनी दिली.