शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ड्रग तस्करांकडे छापेमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहर पोलिसांनी गेल्या सात तासात ८६ ठिकाणी छापेमारी करून १३ लाखांची (१३० ग्रॅम) एमडी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहर पोलिसांनी गेल्या सात तासात ८६ ठिकाणी छापेमारी करून १३ लाखांची (१३० ग्रॅम) एमडी, ७.८ लाखांची (१३३ ग्रॅम) चरस आणि अडीच किलो गांजा जप्त केला. या कारवाईमुळे शहरातील ड्रग तस्करांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज दुपारी शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील ड्रग तस्कर तसेच ड्रग पेडलर्स यांच्याकडे एकाचवेळी नियोजनबद्धरीत्या कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कारवाईसाठी एकूण ८६ पथके तयार करण्यात आली. या पथकाने शहरातील अमली पदार्थाचा व्यवसाय करणाऱ्या ८६ गुन्हेगारांशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. दुपारी ४ वाजतापासून सुरू झालेली ही कारवाई रात्री ११.१५ वाजेपर्यंत सुरूच होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी १३० ग्रॅम एमडी, १३० ग्रॅम चरस आणि अडीच किलो गांजा असे एकूण १९ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले. या कारवाई दरम्यान २० आरोपींना ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान काही ठिकाणी जुगार अड्डे पोलिसांना सापडले. तर काही गुन्हेगारांकडे शस्त्रही सापडले. रात्री ११.१५ नंतरही कारवाई सुरूच होती. या संबंधाने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उपलब्ध माहितीला दुजोरा दिला. अनेक ठिकाणी ड्रग तस्करांकडे शस्त्रही सापडले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले.

'ड्रग फ्री सिटी' बनवायची आहे

नागपूर शहराला 'ड्रग फ्री सिटी' बनवायचे आहे. त्या पार्श्वभूमीवर आजची ही छापामारी कारवाई असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

---