शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
3
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
4
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
5
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
6
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
7
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
8
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
9
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
10
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
11
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
12
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
13
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
14
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
16
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
17
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
18
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
19
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
20
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

पाकीट मारले, ‘अ‍ॅफिडेव्हिट’ आणा

By admin | Updated: June 15, 2015 02:58 IST

पाकीट चोरीला गेलेला एक युवक रविवारी दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोहोचला.

लोहमार्ग पोलिसांचा खाक्या : तक्रार घेण्याऐवजी प्रवाशाला पळविलेनागपूर : पाकीट चोरीला गेलेला एक युवक रविवारी दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने तक्रार नोंदविण्याची मागणी केली. परंतु डायरीवरील पोलिसाने त्याच्या खिशात एकही रुपया शिल्लक राहिलेला नसताना त्यास पाकीट चोरीला गेल्याचे शपथपत्र लिहून आणण्यास सांगितले अन् त्याला पिटाळून लावले.साहुद आलम (२४) रा. झारखंड हा युवक रेल्वेगाडी क्रमांक १२७२३ एपी एक्स्प्रेसने सिकंदराबादवरून नागपुरात आला. नागपुरात उतरून त्यास दुसरी गाडी पकडायची होती. तो प्लॅटफार्म क्रमांक एकवर उतरला आणि बाजुलाच असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएममध्ये गेला. तेथे त्याने पैसे काढले आणि प्लॅटफार्म क्रमांक १ वरील स्वच्छतागृहात गेला. तेथून बाहेर पडून तो तिकीट खरेदीसाठी जात असताना त्याला टीसीने तिकीट दाखविण्यासाठी हटकले. त्याने खिशात हात घातला असता त्याला आपले पाकीट चोरीला गेल्याचे समजले. त्यावर त्याने उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालय गाठले. तेथून त्याला लोहमार्ग पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला देण्यात आला. लोहमार्ग पोलिसात डायरीवर उपस्थित पोलिसाने त्यास पाकीट चोरीला गेल्याचे शपथपत्र लिहून आणण्यास सांगितले. नाईलाजास्तव तो युवक पुन्हा उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात परत गेला.तेथे लोहमार्ग पोलिसांनी दिलेले उत्तर ऐकून उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयातील कर्मचारी थक्क झाले. (प्रतिनिधी)उपस्टेशन व्यवस्थापकांनी केली मदतपाकीट चोरीला गेल्यामुळे त्या युवकाच्या चेहऱ्यावर चिंता पसरली होती. त्याची स्थिती पाहून उपस्टेशन व्यवस्थापक राजु इंगळे, प्रमोद शेंडे, शंकर चंदन, राजेंद्र तायडे यांनी आपल्या पाकिटातील रक्कम काढली. २५० रुपये किमतीचे राचीला जाण्याचे तिकीट आणि १५० रुपये प्रवासात खर्चासाठी त्या तरुणास त्यांनी दिले.