शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातून लवकरच पुणे, अमृतसर एक्स्प्रेस

By admin | Updated: February 12, 2015 02:27 IST

नागपुरात राहणाऱ्या उत्तर भारतीय नागरिकांची मागील अनेक दिवसांपासून रिवाला थेट रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी होती.

नागपूर : नागपुरात राहणाऱ्या उत्तर भारतीय नागरिकांची मागील अनेक दिवसांपासून रिवाला थेट रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी होती. रिवा एक्स्प्रेस सुरू झाल्यामुळे त्यांची मोठी सुविधा झाली असून लवकरच नागपुरातून अमृतसर आणि पुण्यासाठी रेल्वेगाडी सुरूकरण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.नागपूर रेल्वेस्थानकावर नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या नागपूर-रिवा एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी या गाडीचा शुभारंभ केला. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अविनाश पांडे, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, आमदार कृष्णा खोपडे उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, नागपुरात घरेलू कामकाज करणारे रिवाचे अनेक नागरिक राहतात. त्यामुळे त्यांच्यासाठी रिवा एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून उत्तर भारतीय मोर्चाने केली होती. ही गाडी सुरू केल्याबद्दल त्यांनी रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले. नागपूरकर जनतेसाठी नव्या रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुपारी २.५० वाजता हिरवी झेंडी दाखवून त्यांनी नागपूर-रिवा एक्स्प्रेसचा शुभारंभ केला. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ. पी. सिंह, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. जयदीप गुप्ता, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. सुमंत देऊळकर, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी. एल. कोरी, सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस.जी. राव, व्ही.पी. डहाट, स्टेशन व्यवस्थापक संजयकुमार दाश आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)