शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पुड्डूचेरीतील कैद्यांना १७० रुपये मजुरी मग महाराष्ट्रातील कैद्यांना ४० रुपये का ?

By admin | Updated: June 4, 2015 02:42 IST

पुड्डूचेरी येथील कुशल कैद्यांना कामाची मजुरी १७० रुपये मिळते मग महाराष्ट्र राज्यातील कैद्यांना ४० रुपये का,...

राहुल अवसरे नागपूरपुड्डूचेरी येथील कुशल कैद्यांना कामाची मजुरी १७० रुपये मिळते मग महाराष्ट्र राज्यातील कैद्यांना ४० रुपये का, देशातील विविध राज्यातील कैद्यांना दिल्या जाणाऱ्या मजुरींमध्ये मोठी तफावत आहे. ही मजुरी एकसमान का केली जात नाही, असे प्रश्न निर्माण केले जात आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या २०१३ च्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण ४३ कारागृहांमध्ये ८०४१ शिक्षा झालेले कैदी आहेत. केवळ शिक्षा होऊन कारावास भोगत असलेल्या कैद्यांनाच विविध कामात गुंतवून त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला ‘मजुरी’ दिली जाते. कामात कुशल असलेल्या कैद्याला ४० रुपये, अर्ध कुशलला ३५ रुपये आणि अकुशल कैद्याला २५ रुपये मजुरी दिली जाते. या कैद्यांना सुतारकाम, टेक्सटाईल, पॉवरलूम, टेलरिंग, लोहारकाम, बेकरी, कार वॉशिंग आणि लॉंड्रीची कामे दिली जातात.प्रत्येक कैद्यांवर २१ हजाराचा खर्चसध्या राज्याचा कारागृहांवरील खर्च १८६ कोटी २८ लाखांचा आहे. त्यापैकी आहारावर २७ कोटी ७ लाख, कपड्यांवर ३७ लाख ४० हजार , वैद्यकीय उपचारावर १ कोटी ३१ लाख ७० हजार आणि इतर खर्च २२ कोटी ६२ लाख ३० हजार रुपये आहे. प्रत्यक्ष कैद्यांवरचा एकूण खर्च ५१ कोटी ३८ लाख २० हजार रुपयाचा आहे. अर्थात प्रत्येक कैद्यावर वर्षाला २१ हजार रुपये खर्च होत आहेत.माहितीच्या अधिकारात प्राप्त केलेल्या माहितीमध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहाचा वार्षिक खर्च १० कोटी ३३ लाख ७० हजार ८१९ रुपये दाखवण्यात आलेला आहे. त्यापैकी वेतनावर ६ कोटी २ लाख ४७ हजार ४०७, मजुरीवर ४६ लाख ६५ हजार ९०५, अन्य भत्त्यांवर १५ लाख ४५ हजार ९३०, विजेचा खर्च ८३ लाख ६७ हजार ५४, प्रवासावर ५ लाख ८४ हजार ४५२, कार्यालयीन खर्च ३ लाख ७१ हजार, भाडेपट्टी ७७ हजार १७९, संगणक ५० हजार २५, आहाराचा खर्च २ कोटी १८ लाख १५ हजार २४४, इतर खर्च ५५ लाख ८५ हजार ९९४ रुपये एवढा आहे.