शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

ही तर प्रसिद्धी याचिका !

By admin | Updated: April 29, 2016 02:48 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रावणदहनाला आव्हान देणाऱ्यावर गुरुवारी २५ हजार रुपये ...

रावणदहनाला आव्हान देणारी याचिका फेटाळली : दुष्काळ निधीमध्ये २५ हजार जमा करा नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रावणदहनाला आव्हान देणाऱ्यावर गुरुवारी २५ हजार रुपये ‘कॉस्टस्’ (दावा खर्च) बसवला. तसेच, याचिकाकर्त्याने कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केल्याचे निरीक्षण नोंदवून संबंधित जनहित याचिका फेटाळून लावली. याचिकाकर्त्याला २५ हजार रुपये दोन आठवड्यामध्ये मुख्यमंत्री दुष्काळ निधीत जमा करण्यास सांगण्यात आले आहे. ही जनहित याचिका नसून प्रसिद्धीसाठी केलेला खटाटोप आहे असे मौखिक मत न्यायालयाने निर्णयापूर्वी व्यक्त केले.जनार्दन मून असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते नागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष आहेत. त्यांनी अ‍ॅड. अश्वीन इंगोले यांच्यामार्फत ही याचिका सादर केली होती. विजया दशमीच्या दिवशी देशभर रावणदहनाचे कार्यक्रम होतात. ही प्रथा बंद करण्यात यावी अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांनी प्राथमिक सुनावणीनंतर याचिकाकर्त्यावर ताशेरे ओढून वरीलप्रमाणे निर्णय दिला.काय होते याचिकाकर्त्याचे म्हणणेमुंबई पोलीस कायद्यातील कलम १३१, १३४ व १३५ अनुसार कोणत्याही व्यक्तीचा प्रतिकात्मक पुतळा जाळणे गुन्हा आहे. कायद्यानुसार, पुतळा जाळण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकत नाही. असे असताना पोलीस संरक्षणात रावणदहनाचे कार्यक्रम होतात. रावणाचा पुतळा उभारून त्यात फटाके भरले जातात. केरळमधील मंदिरात अलिकडेच फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत मोठी प्राणहानी झाली. रावणदहनाच्या कार्यक्रमात नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित असतात. त्यावेळी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे रावणदहन कार्यक्रम कायदेबाह्य ठरवून त्यावर बंदी आणण्यात यावी असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते.