शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक बांधकाम खात्याचा चक्काजाम

By admin | Updated: June 30, 2014 00:39 IST

वाहनांच्या वेगासाठी एक्स्प्रेस-वे निर्माण करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याची सध्या स्वत:चीच गती मंदावली आहे. १८ वर्षे लोटूनही कार्यकारी अभियंत्यांना पदोन्नत्या नाही. तर दुसरीकडे मुख्य

यवतमाळ : वाहनांच्या वेगासाठी एक्स्प्रेस-वे निर्माण करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याची सध्या स्वत:चीच गती मंदावली आहे. १८ वर्षे लोटूनही कार्यकारी अभियंत्यांना पदोन्नत्या नाही. तर दुसरीकडे मुख्य अभियंत्यांची (सीई) राज्यात १७ पैकी आठ तर अधीक्षक अभियंत्यांची (एसई) ५७ पैकी १८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे बांधकाम खात्यात जणू विकासाचा ‘चक्काजाम’ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यात वर्षानुवर्षे अभियंत्यांच्या बढत्या रोखल्या जात आहेत. सेवानिवृत्ती तोंडावर येऊनही बढती मिळत नसल्याने अभियंते निराश होत आहेत. यासाठी कोर्ट केसेसचे कारण पुढे केले जात असले तरी प्रत्यक्षात महसुलातील एक अधिकारी या संथ कारभारासाठी जबाबदार असल्याचे बांधकाम खात्यात बोलले जाते. आजच्या घडीला राज्यात मुख्य अभियंत्यांच्या आठ जागा रिक्त आहेत. त्यानंतरही बांधकाम अभियंत्यांना एमएमआरडीए व एमएसआरडीसी येथे प्रतिनियुक्तीवर पाठविले जात आहे. अधीक्षक अभियंत्यांच्या १८ जागा रिक्त आहेत. पुढील दोन महिन्यात त्यात आणखी आठ ते दहा जागांची भर पडणार आहे. पूर्व विदर्भात तर अधीक्षक अभियंत्याच्या सर्वच जागा रिक्त आहेत. कार्यकारी अभियंत्याकडे प्रभार देऊन कारभार चालविला जात आहे. रिक्त जागेचा प्रभार त्याच भागातील अभियंत्याला देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६०० किलोमीटरवरील सोयीच्या अभियंत्यांकडे प्रभार देण्याचा अनोखा पायंडा बांधकाम खात्यात पडला आहे. १७ ते १८ वर्षे सेवा होऊनही कार्यकारी अभियंत्यांना बढत्या मिळेनाशा झाल्या आहेत. एकूणच या खात्याचा कारभार प्रभारावर सुरू आहे. पावसाळ्यापूर्वीच सर्व मार्गांवर मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यातून अपघात वाढले आहे. परंतु त्यानंतरही त्यावर लक्ष देण्यासाठी सक्षम अभियंते उपलब्ध नाहीत. पावसाळ्यात या रस्त्यांची अवस्था आणखी भयावह होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)