शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

जनतेने कौल दिला; हवी आश्वासनांची पूर्ती

By admin | Updated: May 19, 2014 00:44 IST

भ्रष्टाचार, महागाई व बेरोजगारी यामुळे सामान्यांचा काँग्रेसवर रोष होता. निवडणुकीतून तो व्यक्त केला. लोकांनी पर्याय म्हणून नरेंद्र मोदींना स्पष्ट कौल दिला.

 निवडणूक विश्लेषण: नागपूर श्रमिक पत्रकार भवनातील चर्चेचा सूर

 नागपूर : भ्रष्टाचार, महागाई व बेरोजगारी यामुळे सामान्यांचा काँग्रेसवर रोष होता. निवडणुकीतून तो व्यक्त केला. लोकांनी पर्याय म्हणून नरेंद्र मोदींना स्पष्ट कौल दिला. आता नवीन सरकारकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मोदी युपीए सरकारचीच आर्थिक धारणे राबविल की त्यात बदल करेल याची उत्सुकता आहे. आता त्यांनी निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करावी. मोदी सरकार लोकांच्या विश्वासाला पात्र ठरले तरच भविष्यात जनतेचा पाठिंबा कायम राहील. अन्यथा पुढील निवडणुकीत मतदार मोदी सरकारलाही नाकारतील. असा सूर नागपूर श्रमिक पत्रकार भवनात रविवारी झालेल्या चर्चेतून पुढे आला. निवडणुकीत मोदी लहर की, काँग्रेसवर रोष यावर चर्चा करण्यात आली. लोकमान्य टिळक पत्रकार भवन, नागपूर श्रमिक पत्रकार संघ व यूसीएन वाहिनीच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, प्रदीप मैत्र, अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले व अनुपम सोनी आदी उपस्थित होते. बाळ कुळकर्णी मतदारांनी काँग्रेस नको म्हणून मतदान केलेले नाही तर मोदी सरकार हवे म्हणून मतदान केले. काँग्रेस ही निवडणूक लढलीच नाही . अरु ण फणशीकर लोकांच्या मनात काँग्रेस विषयी प्रचंड रोष होता. महायुतीला एकहाती सत्ता दिली. विदर्भातील ६२ विधानसभा क्षेत्रापैकी फक्त ३ ठिकाणी आघाडी पुढे होती. श्रीपाद अपराजित काँग्रेसला सक्षम पर्याय दिला तर चांगले परिणाम मिळतील. म्हणून मतदारांनी काँग्रेसच्या विरोधात कौल दिला. विवेक देशपांडे काँग्रेस नेत्यांचा पूर्वीसारखा लोकाशी संपर्क राहिला नसल्याने लोकांना काँग्रेस नको होती. पर्याय म्हणून मोदींना पसंती दिली. सुधीर पाठक विजयी पक्षाचे स्वागत करण्याची परंपरा काँग्रेसने पाळली नाही. नवीन सरकारकडुन लोक ांच्या अपेक्षा आहे. १९७७ साली काँग्रेस विरोधात कौल गेला होता. परंतु ३ वर्षांनी काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली होती. जयदीप हर्डीकर ही निवडणूक जातीच्या आधारावर नव्हे तर सामाजिक व आर्थिक धोरणावर लढली गेली. मागील काही वर्षात काँग्रेसच्या सामान्याशी संपर्क तुटल्याने लोकांनी काँग्रेसला नाकारले. शैलेश पांडे युपीए सरकारचा मागील १० वर्षाचा निराशाजनक क ारभार, मोदींनी दोन वर्षापासून निवडणुकीची तयारी चालविली होती. काँग्रेसने मोदीला हलक्याने घेतल्याने कौल त्यांच्या विरोधात गेला. प्रकाश दुबे मतदारात काँग्रेसविषयी रोष होता. मोदींचा सक्षम पर्याय मिळाल्याने काँग्रेसच्या विरोधात कौल दिला. श्रीनिवास खांदेवाले मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार युपीएच्याच आर्थिक धोरणाचा स्वीकार करणार असेल तर परिस्थितीत फारसा बदल होणार नाही. मोदी मॉडेलमुळे देशातील सर्वच समस्या सुटतील, असे म्हणणे धाडसाचे होईल. गुजरात मॉडेल सर्वच राज्यात शक्य नाही. अ‍ॅड. अनिल किल्लोर भाजपने वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता विदर्भासाठी चांगले दिवस आले आहे. नवीन सरकारने वेगळ्या विदर्भाचा निर्णय विधानसभा निवडणुकीपूर्वी घेतला नाही तर भविष्यात वैदर्भीय भाजपचा मानसन्मान करणार नाही. शरद पाटील लोकांनी काँग्रेसच्या विरोधात कौल दिला आहे. मोदींच्या बाजूने नाही. सामान्य माणूस आता जागृत झाला आहे. आशिष देशमुख मोदींच्या नेतृत्वामुळे भाजपला यश मिळाले. यात कार्यकर्त्यांचीही मेहनत आहे. आता पक्षाने वेगळ्या विदर्भाचे आश्वासन पाळावे. किशोर तिवारी एनडीएकडे आर्थिक कार्यक्रम नाही. आर्थिक धोरणाशिवाय परिवर्तन शक्य नाही. धंदा म्हणून काही लोक राजकारणात आले आहेत. अतुल लोंढे युपीए सरकार विषयी लोकांच्या मनात नाराजी होती. भाजपने मोठमोठी आश्वासने दिली. आता १० कोटी लोकांना रोजगार कसा देणार? जयप्रकाश गुप्ता काँग्रेस विरोधात मोदींची लाट निर्माण होण्याला काँग्रेसच जबाबदार आहे. काँग्रेसनेच मोदींचे मार्के टिंग केले. काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज आहे. यातून लवकरच हा पक्ष सावरेल. (प्रतिनिधी)