प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:09 IST2021-04-16T04:09:14+5:302021-04-16T04:09:14+5:30

नागपूर - परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांच्या पथकाने खामल्यातील सिंधी कॉलनीत बुधवारी सायंकाळी छापा घालून प्रतिबंधित सुगंधित ...

Prohibited scented tobacco confiscated | प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त

प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त

नागपूर - परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांच्या पथकाने खामल्यातील सिंधी कॉलनीत बुधवारी सायंकाळी छापा घालून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला.

मॉ वैष्णवी ट्रेडर्सचा संचालक अरविंद गलुराजमल पंजवानी (वय ४५) हा खामल्यात सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याची लपून छपून विक्री करीत असल्याचे कळताच उपायुक्त नुरूल हसन यांच्या पथकातील नायक रितेश मलगुलवार, धर्मेंद्र यादव, प्रवीण फलके, फईम खान, पल्लवी तुरणकर यांनी तेथे बुधवारी सायंकाळी ५ वाजता छापा मारला. यावेळी पोलिसांना पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळला. पोलिसांनी तो जप्त केला. आरोपी अरविंद पंजवानी याच्याविरुद्ध पुढील कारवाई करण्यासाठी पोलिसांनी अन्न व सुरक्षा विभागाच्या पथकाला बोलावून हा साठा त्यांच्या हवाली केला.

----

Web Title: Prohibited scented tobacco confiscated