A procession of 100 year old Kodanddhari Shriram photo | १०० वर्षे जुन्या कोदंडधारी श्रीराम फोटोची निघणार मिरवणूक

१०० वर्षे जुन्या कोदंडधारी श्रीराम फोटोची निघणार मिरवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अयोध्येत मंदिराचा भूमिपूजन सोहळा बुधवारी साजरा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. नागपुरातही ठिकठिकाणी सामूहिक रामरक्षा पठण, हनुमान चालिसा आदींचे आयोजन होणार आहे. संध्याकाळी घरोघरी दीपप्रज्वलन करण्यात येऊन ‘श्रीराम दीपोत्सवा’ची तयारी केली जात आहे.

दीपोत्सवाचा आनंद साजरा करण्यासोबतच रेशीमबागेतील निवासी रमेश पोफळी यांच्या घरी असलेल्या शंभर वर्षांहून जुन्या असलेला कोदंडधारी श्रीरामाच्या फोटोची मिरवणूकही काढली जाणार आहे. ही मिरवणूक फिरणार नसून, परिसरातील कार्यकर्ते या फोटोला ठेवून दीपोत्सव व जल्लोष करणार आहेत. माझे वय ७३ वर्षाचे आणि त्यापूर्वीपासून आमच्या कुटुंबात हा फोटो असल्याने शंभर वर्षाचा अंदाज बांधल्याचे ते सांगतात.

 

Web Title: A procession of 100 year old Kodanddhari Shriram photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.