शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल, लॅपटॉप सर्व्हिसिंग करण्याची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:07 IST

नागपूर : लॉकडाऊनमुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या सर्व्हिसिंगची दुकाने बंद असल्याने लोकांना मोबाइल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर सर्व्हिसिंगची समस्या निर्माण झाली आहे. ...

नागपूर : लॉकडाऊनमुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या सर्व्हिसिंगची दुकाने बंद असल्याने लोकांना मोबाइल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर सर्व्हिसिंगची समस्या निर्माण झाली आहे.

लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवांच्या दुकानांव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद आहेत. विशेषत: ऑनलाइन कोचिंग करणारे विद्यार्थी आणि घरून लॅपटॉप आणि संगणकाने कार्यालयीन काम करणाऱ्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काम करताना मोबाइल, लॅपटॉप आणि संगणकामध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत.

लॅपटॉप व मोबाइलधारक मनोज अत्री म्हणाले, सुरक्षेसाठी मोबाइलला सॅनिटायझर लावले होते. त्यानंतर मोबाइलमध्ये तांत्रिक बिघाड आला. स्क्रिन खराब झाले. दुरुस्ती कशी करायची, याची चिंता आहे. ऑनलाइन पेमेंट असो वा मुलांचे कोचिंग सर्वकाही मोबाइलने होते. आता मोबाइल खराब झाल्याने सर्व कामे ठप्प झाली आहेत. मोबाइल रिपेअरिंग शॉप बंद असल्याने दुरुस्तीसाठी समस्या येत आहे. रितू जोशी म्हणाल्या, घरूनच लॅपटॉपवर कार्यालयीन काम करते; परंतु लॅपटॉपमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने काम ठप्प झाले. लॅपटॉप व कॉम्प्युटर सर्व्हिसिंग सेंटर बंद असल्याने लॅपटॉपची दुरुस्ती होऊ शकत नाही. त्यामुळे कार्यालयीन कामावर परिणाम झाला आहे.

हीच समस्या शहरातील अनेक नागरिक आणि विद्यार्थ्यांची असून मोबाइल व लॅपटॉप आणि कॉम्प्युटर सर्व्हिसिंग सेंटर बंद असल्याने त्यांना अनेक समस्या येत आहेत. त्यांनी मोबाइल व कॉम्प्युटर सर्व्हिसिंग सेंटरला अत्यावश्यक सेवेत समावेश करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.