शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

प्र-कुलगुरू बिनपगारी

By admin | Updated: November 27, 2015 03:09 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे पद भूषविणारे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले गेल्या चार महिन्यांपासून विनावेतन काम करत आहेत.

चार महिन्यांपासून वेतन नाही : न्यायालयात याचिका दाखलयोगेश पांडे नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे पद भूषविणारे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले गेल्या चार महिन्यांपासून विनावेतन काम करत आहेत. डॉ.येवले हे विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य असल्याचे कारण समोर करत त्यांना उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून प्राध्यापकपदाच्या मूळ वेतनावर काम करण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे डॉ. येवले हे प्राचार्यपदी असताना त्यांना असलेल्या वेतनापेक्षा ६० ते ७० हजार रुपये कमी मिळणार आहेत. ही वेतननिश्चिती मान्य करण्यास डॉ. येवले यांनी नकार दिला असून याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.डॉ. प्रमोद येवले यांची २९ जून रोजी नागपूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली. याअगोदर ते वर्धा जिल्ह्यातील बोरगाव (मेघे) येथील औषधशास्त्र शिक्षण व संशोधन संस्थेत प्राचार्य म्हणून कार्यरत होते. येथे असताना त्यांचे मूळ वेतन ६९,५६० इतके होते तर ग्रेड पे १०००० इतका होता. विविध भत्ते मिळून त्यांचे वेतन पावणेदोन लाखांच्या आसपास होते. प्र-कुलगुरूपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर नागपूर विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्या वेतननिश्चितीचा प्रस्ताव विभागीय उच्चशिक्षण सहसंचालकांकडे पाठविला. परंतु डॉ. येवले हे कायम विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य होते असे कारण समोर करत प्रस्ताव नाकारला. सहायक प्राध्यापकपदाच्या ३७,४०० या मूळ वेतनावर त्यांची वेतननिश्चिती करण्यात येईल असे सांगण्यात आले व त्या हिशोबाने वेतननिश्चितीदेखील झाली.प्र-कुलगुरूसारख्या मोठ्या पदावर येऊन सहायक प्राध्यापकपदाच्या मूळ वेतनावर काम का करावे, असा सवाल डॉ. येवले यांनी उपस्थित केला व प्राचार्य म्हणून जितके वेतन मिळत होते, तेवढे देण्याची विनंती त्यांनी केली. परंतु त्यांची ही विनंतीदेखील नाकारण्यात आली. यासंदर्भात डॉ.येवले यांनी विद्यापीठ प्रशासनालादेखील पत्र लिहीले. अखेर त्यांनी राज्य शासनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व प्रसन्न वराळे यांच्या न्यायपीठासमक्ष या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. ९१५ क्रमांकावर ही याचिका सुनावणीस ठेवण्यात आली आहे. सहसंचालकांचा दावा, नियमांनुसारच प्रक्रियाकायम विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राचार्यांच्या सेवा ग्राह्य धरण्यात याव्यात. परंतु वेतन संरक्षण करण्याचे सुस्पष्ट आदेश नाहीत असे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार डॉ.येवले यांची वेतननिश्चिती ही नियमांनुसारच करण्यात आली आहे. परंतु त्यांना ती मान्य नाही. त्यांचे हे प्रकरण आता वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आले आहे. माझ्या अधिकारात जेवढे होते, तेवढे मी केले. आता पुढील निर्णय शासनपातळीवरच होईल, असे विभागीस सहसंचालक डॉ. अंजली रहाटगावकर यांनी स्पष्ट केले. त्यांची वेतननिश्चिती झाली असूनदेखील विद्यापीठाने त्यांचे वेतन देयक पाठविलेले नाही. त्यामुळे त्यांचे वेतन झालेले नाही, असेदेखील त्यांनी सांगितले. यासंदर्भात कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे तसेच प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.विद्यापीठाचा पुढाकार नाहीया अडचणीमुळे प्र-कुलगुरूपदावर रुजू झाल्यापासून डॉ.येवले यांना अद्याप वेतन मिळालेले नाही. विद्यापीठाच्या महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्ती वेतनाशिवाय असताना विद्यापीठ प्रशासनानेदेखील काहीही पुढाकार घेतलेला नाही. भूतकाळात विद्यापीठाने अनेक अधिकाऱ्यांचे वेतन सामान्य निधीतून केल्याची उदाहरणे आहेत. त्या पार्श्वभूमीवर डॉ.येवले यांचेदेखील सामान्य निधीतून वेतन देणे अपेक्षित होते.