शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात प्राचार्य अडकले एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 22:43 IST

शिक्षकाकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) प्राचार्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो) पथकाने रंगेहात अटक केली.

ठळक मुद्देशिक्षकाच्या वेतनासाठी मागितली लाचसावनेर आयटीआयमधील कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (सावनेर) : विद्यार्थ्यांना तासिकेप्रमाणे शिकविणाऱ्या शिक्षकाकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) प्राचार्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो) पथकाने रंगेहात अटक केली. पगार काढण्यासाठी त्याने शिक्षकाला एक हजार रुपयांची मागणी केली होती. ही कारवाई सावनेर शहरातील आयटीआयमध्ये गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.सुभाष शिवण्णा पेदापल्लीवार (५६, रा. सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या प्राचार्याचे नाव आहे. ते सावनेर शहरातील शासकीय आयटीआयमध्ये प्राचार्य असून, या आयटीआयमध्ये १५ दिवसांपूर्वी एक शिक्षक रुजू झाले. त्यांना तासिकेप्रमाणे क्राफ्ट निदेशक रविकिरण रुशिया यांच्या मार्फत दिले जाते. त्यांचा १५ दिवसांचा ७,८७५ रुपये पगार थांबविण्यात आला होता. पगाराची रक्कम मिळवून देण्यासाठी त्यांनी सुभाष पेदापल्लीवार यांना विनंती केली. या कामासाठी पेदापल्लीवार यांनी त्यांना एक हजार रुपयांची मागणी केली.त्यामुळे शिक्षकाने गुरुवारी (दि. १०) या प्रकाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयात तक्रार नोंदविली. त्यामुळे ‘एसीबी’चे पथक चार दिवसांपासून सुभाष पेदापल्लीवार यांच्या मागावर होते. दरम्यान, ‘एसीबी’च्या पथकाने गुरुवारी सायंकाळी आयटीआय परिसरात सापळा रचला होता. सुभाष पेदापल्लीवार हे त्यांच्या केबिनमध्ये शिक्षकाकडून लाच स्वीकारत असताना पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.ही कारवाई ‘एसीबी’च्या पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश बुधलवार, उपअधीक्षक विजय माहुलकर, मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनात ‘एसीबी’चे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, सुनील कळंबे, दिनेश शिवले, शालिनी जांभूळकर, सुशील यादव, नरेंद्र चौधरी, राजेश बन्सोड यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागiti collegeआयटीआय कॉलेजTeacherशिक्षक