शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

कापसावरील आयात शुल्क हटवण्यासाठी सरकारवर दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 10:55 IST

सीओसीपीसी, सीएआय व सीमाचे समर्थन : कॉटन ब्रोकर असोसिएशनचा विरोध

सुनील चरपे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टेरिफ वॉरनंतर भारताने अमेरिकेतील कापसाच्या आयातीवरील शुल्क पूर्णपणे हटवावा, या मागणीसाठी कापूस उत्पादन व वापर समिती (सीओसीपीसी), कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय) आणि साऊथ इंडिया मिल्स असोसिएशन (सीमा) ने केंद्र सरकारवर दबाव निर्माण करायला सुरुवात केली आहे. ऑल इंडिया कॉटन ब्रोकर असोसिएशनने कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द करण्यास विरोध दर्शवला आहे.

भारतात कापसाचे उत्पादन घटत आहे. चालू वर्षात एकूण २९० लाख गाठी कापसाचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज सीएआयने व्यक्त केला आहे.देशातील कापसाचा वापर व मागणी ३१५ लाख गाठी आहे. कमी उत्पादनामुळे देशातील वस्त्रोद्योग संकटात येईल. कापसावरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द करावे, ते शक्य नसल्यास एक महिन्यासाठी हटवल्यास भारत व अमेरिकेचे व्यापारी संबंध अधिक मजबूत होतील, या बाबी तिन्ही संघटना सरकारला पटवून देत आहेत.

आयात शुल्क हटवल्यास किंवा कमी केल्यास कापसाची आयात वाढेल. त्यातून दर दबावात राहणार असल्याने भारतीय कापूस उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. देशातील जिनिंग व स्पिनिंग उद्योगाला मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने आयात शुल्क कायम ठेवावे. देशात कापसाची उत्पादकता, उत्पादन व अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाचे उत्पादन वाढवून आत्मनिर्भर होण्यावर भर द्यावा, अशी आग्रही भूमिका ऑल इंडिया कॉटन ब्रोकर असोसिएशनने घेतली आहे.

दरातील तफावतसध्या अमेरिकेत रुईचे दर प्रतिखंडी ४८ ते ५० हजार रुपये तर भारतात ५३,७०० ते ५५,५५० रुपये आहेत. ११ टक्के आयात शुल्क ग्राह्य धरून अमेरिकेतील रुईचा दर ५८ हजार रुपये प्रतिखंडीवर पोहोचतो. आयात शुल्क रद्द केल्यानंतर पॅकिंग, वाहतूक व इतर खर्च विचारात घेतल्यास हा दर ५१ ते ५४ हजार रुपये प्रतिखंडीवर जातो. ही तफावत पाहता आयात केलेली रुई स्वस्त पडत नाही.

अतिरिक्त लांब धाग्यावर भरभारतात अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाचे उत्पादन कमी असले, तरी देशांतर्गत बाजारात धाग्याच्या रुईचे दर सध्या ७५ हजार ते ७७,५०० रुपये प्रतिखंडी आहेत. हे दर अमेरिकेतील दराला समांतर आहेत. या कापसाचे देशात उत्पादन वाढवणे सहज शक्य आहे. त्यासाठी अमेरिकेसमोर पायघड्या न घालता भारताने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. 

टॅग्स :cottonकापूसnagpurनागपूरFarmerशेतकरी