शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षांची मर्जी, विदर्भावर अन्याय

By admin | Updated: August 20, 2016 02:36 IST

केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीडब्ल्यूई) मुख्यालयाच्या स्थानांतरणाचा प्रस्ताव थांबविण्यात आला होता.

केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळ स्थानांतरणाचा वाद : विरोधात कर्मचारी संघटना एकवटल्या नागपूर : केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीडब्ल्यूई) मुख्यालयाच्या स्थानांतरणाचा प्रस्ताव थांबविण्यात आला होता. श्रम मंत्रालयाने याआधी प्रस्ताव पुनर्विचारासाठी मंडळाकडे पाठविला होता. मात्र मंडळाचे विद्यमान अध्यक्ष के . लक्ष्मा रेड्डी यांनी मुख्यालयाचे दिल्ली येथे स्थानांतरणाला प्रतिष्ठेचा विषय बनवला आहे. त्यामुळे एका व्यक्तीच्या इच्छेसाठी विदर्भाच्या वैभवावर घाला आणणार का, असा संतप्त सवाल कर्मचाऱ्यांच्या संघटनेने केला आहे. श्रमिक शिक्षण मंडळाच्या मुख्यालयाच्या स्थानांतरणाच्या विषयावर आता थेट अध्यक्ष आणि कर्मचारी असा संघर्ष सुरू झाला आहे. मुख्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी आता थेट अध्यक्ष लक्ष्मा रेड्डी यांच्याविरोधात उभे ठाकले आहेत. गेल्या १५ दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे निषेध आंदोलन सुरू असून दुसऱ्या टप्प्यातील धरणे आंदोलनाला चार दिवस झाले आहेत. मंडळ कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला अनेक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समर्थन जाहीर केले आहे. राज्याचे माजी मंत्री व काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी याआधीच आंदोलनाला समर्थन दिले आहे. त्यांच्यासोबत काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे, विदर्भ आंदोलनाचे नेते जांबुवंतराव धोटे यांनीही कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिल्याचे सीबीडब्ल्यूई कर्मचारी संघटनेचे राजेश मिश्रा यांनी सांगितले. याशिवाय एमएसईबी वर्कर्स फेडरेशन यवतमाळचे कार्याध्यक्ष रणजितसिंह बघेल, नागपूर जिल्हा इंटकचे उपाध्यक्ष भास्कर जाधव, पेन्शनर्स संघटनेच्या कार्याध्यक्ष नीलिमा बॅनर्जी, सार्वजनिक हक्क निवारण समितीच्या मंगला कोल्हे यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्याचे मिश्रा यांनी सांगितले. रेल्वे, डिफेन्स व इतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी याआधीच समर्थन जाहीर केले आहे. दरम्यान कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी नुकतीच केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांची भेट घेतली असून त्यांनी या बाबीकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिल्याचे राजेश मिश्रा यांनी सांगितले. याचवेळी विदर्भवाद्यांनी श्रमिक शिक्षण मंडळ मुख्यालयाच्या बचावासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन अ. भा. केंद्रीय सरकारी कर्मचारी परिसंघाचे महासचिव एन.एस. पिल्लै यांनी केले आहे.(प्रतिनिधी) दिल्लीचे क्षेत्रीय कार्यालय होणार मुख्यालय? दरम्यान दिल्लीच्या रोहिणी येथे मंजुरी मिळालेल्या क्षेत्रीय कार्यालयाचे येत्या २३ आॅगस्ट रोजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते उद््घाटन होणार आहे. क्षेत्रीय कार्यालयाची मंजुरी घेऊन येथे मुख्यालय स्थापण्याचा घाट मंडळ अध्यक्ष रेड्डी यांनी घातल्याचा आरोप एन.एस. पिल्लै यांनी केला. याबाबत श्रम मंत्रालयाकडे तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.