शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
2
विमानात चिनी वस्तूंना नो एन्ट्री! ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊल; भेटवस्तूही डस्टबिनमध्ये फेकल्या
3
LPG बाबत चांगली बातमी आली समोर, काय आहेत लेटेस्ट दर? बुक करण्यापूर्वी जाणून घ्या
4
मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर काही तासांत दोन भीषण अपघात; ३ ठार, अनेकजण जखमी!
5
LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बीसीसीआयची कारवाई; CSK विरुद्ध सामन्यात त्याच्याकडून झाली चूक!
6
"माझ्या दुःखाचे कारण माझी पत्नीच..." लग्नानंतर ९ वर्षांनी इंजिनिअरने संपवले जीवन, व्हॉट्सॲपवर ठेवला स्टेटस
7
१७ ते २३ मे : अडलेल्या कामांना गती देणारा काळ, फक्त घ्या 'ही' काळजी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
8
कांदा १२.३५ रुपये किलो दराने खरेदी करणार, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
9
'इराण अण्वस्त्रे बाळगू शकत नाही', ट्रम्प यांच्या भेटीनंतर शी जिनपिंग यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास सहमती दर्शवली
10
Gold Silver Price Today May 16: चांदी ₹२० हजारांपेक्षा अधिकनं घसरली, सोनंही धडाम, पाहा २४K, २२K, १८K गोल्डचा रेट
11
NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधाराला अटक, पेपर कसा फुटला?
12
‘काही बेरोजगार हे झुरळासारखे, ते पुढे आरटीआय कार्यकर्ते बनतात’, सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी याचिकाकर्त्याला  सुनावले
13
न्यायालयावर निर्णय लांबविण्याचा आरोप करणे थांबवा; कोर्टाचा उद्धवसेनेला इशारा
14
आर्थिक संकट, सोन्याची दरवाढ, अन्...; बाबा वेंगाने २०२६ बाबत वर्तवली होती काळजीत टाकणारी भाकितं! खरी ठरणार? 
15
कोणत्याही कराराविना संपला डोनाल्ड ट्रम्प यांचा चीन दौरा; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
16
शनी जयंती २०२६: ऑफिसच्या कामात व्यग्र आहात? तरीही शनी देवाला प्रसन्न करतील 'हे' २ सोपे मंत्र!
17
रुपया ९६ पार, इतिहासात पहिल्यांदा डॉलरच्या तुलनेत इतकी कमकुवत झाली भारतीय करन्सी; सामान्यांवर काय परिणाम होणार?
18
मोर्चा ‘वर्षा’वर धडकण्यापूर्वीच पोलिसांकडून नेत्यांची धरपकड; पोलिसांच्या कारवाईचा निषेध
19
अमित शाह यांना धमकी देणं भोवलं, अभिषेक बॅनर्जी यांच्यावर बंगालमध्ये गुन्हा दाखल; कारवाई होणार
Daily Top 2Weekly Top 5

सुरेल संगीताचा ‘हावरा-बॉम्बे एक्स्प्रेस’ स्वरसाधनातर्फे सादर

By admin | Updated: May 19, 2014 00:47 IST

भारतीय चित्रपट संगीतात मूळ बंगाली संगीतकारांचे योगदान वादातीत आहे. बंगाल हा प्रांत तसा रसिक आणि कलेवर प्रेम करणारा. त्यामुळेच बंगालमध्ये शास्त्रीय संगीताची आवड प्रामुख्याने आहे.

रोटरी क्लब आॅफ साऊथचे आयोजन

नागपूर : भारतीय चित्रपट संगीतात मूळ बंगाली संगीतकारांचे योगदान वादातीत आहे. बंगाल हा प्रांत तसा रसिक आणि कलेवर प्रेम करणारा. त्यामुळेच बंगालमध्ये शास्त्रीय संगीताची आवड प्रामुख्याने आहे. मूळ बंगाली पार्श्वभूमीतून आलेल्या अनेक संगीतकारांनी नंतर मुंबईत चित्रपटांना संगीत देताना बंगाली स्पर्श असलेले आणि शास्त्रीय रागदारीवर आधारित गीतांनी तमाम रसिकांना वेड लावले. याच गीतांचा एक अनोखा कार्यक्रम रोटरी क्लब आॅफ साऊथच्यावतीने डॉ. देशपांडे सभागृहात सादर करण्यात आला. स्वरमधुराच्या गायक आणि वादक कलावंतांनी तयारीने सादरीकरण करीत हा कार्यक्रम रंगविला. कार्यक्रमाचा प्रारंभ राजेश दुरुगकरने ‘राही मनवा...’ या गीताने केला. त्यानंतर त्याने ‘जब दिल ही टूट गया...’ या गीताने रसिकांची दाद घेतली. श्रद्धा जोशीने ‘जा रे जा...’ तर मंजिरी वैद्यने ‘घडी घडी मेरा दिल... मेरा नाम चिन चि चू..., ओ बेकरार दिल...’ आदी गीतांनी रंगत आणली. राजेश दुरुगकर, मंजिरी वैद्य, विजय चिवंडे, श्रद्धा जोशी, अमोल या गायकांनी यावेळी तयारीने सादरीकरण करून रसिकांना जिंकले. कार्यक्रमात ‘ये रात ये चांदनी..., सुन मेरे..., जाता कहाँ हे..., कुछ दिल ने कहाँ..., दिल पुकारे..., होठो मे ऐसी बात..., जिंदगी कैसी है पहेली..., दम मारो दम..., एक चतुर नार..., पिया बावरी..., तुम भी चलो..., सारा प्यार हमारा..., पल पल दिल के पास..., माना हो तुम..., कुछ ना कहो..., ये हवाएं...’ आदी गीते सादर करण्यात आली. गायकांना आॅक्टोपॅडवर नंदू गोहाणे, तबला अशोक टोकलवार, ढोलकीवर रघुनंदन परसटवार, बासरी अरविंद उपाध्ये, महेंद्र ढोले आणि गोविंद गडीकर की-बोर्डवर, गिटारवर पांडे यांनी सुयोग्य साथसंगत केली. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण आणि रसाळ संवाद साधणारे निवेदन नासिर खाँ यांनी केले. (प्रतिनिधी)