शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व पावसाने उडविली दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात मान्सूनपूर्व झालेल्या पहिल्याच पावसाने पुणेकरांची चांगलीच दाणादाण उडवली. मंगळवारी दुपारी शहरात बहुतेक सर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरात मान्सूनपूर्व झालेल्या पहिल्याच पावसाने पुणेकरांची चांगलीच दाणादाण उडवली. मंगळवारी दुपारी शहरात बहुतेक सर्व भागांत पाऊण तास पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले तर दक्षिण-पश्चिम नागपूरसह विविध भागांत रस्त्यांवर झाडे पडली. यामुळे वीजपुरवठादेखील खंडित होता. अद्याप मान्सूनचे आगमन व्हायचेच असताना मनपाच्या पावसाळ्याच्या तयारीचे या पावसामुळे पूर्णपणे वाभाडे निघाले.

सकाळपासून आभाळात ढग दाटून आले होते. दुपारी दोनच्या सुमारास अचानक पावसाला सुुरुवात झाली. सोबतच वारेदेखील वाहत होते. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही घरांमधील शेडचे पत्रेदेखील उडून गेले तर अनेक ठिकाणी पाणी साचले. शहराच्या काही भागांत झाडांच्या फांद्या तर काही ठिकाणी झाडे कोसळली. प्रामुख्याने माटे चौक, आयटी पार्क परिसर, बजाजनगर, दीक्षाभूमी मार्ग, स्वावलंबी नगर, दीनदयाल नगर यांचा समावेश होता. झाडे पडल्यामुळे वीजपुरवठादेखील विस्कळीत झाला होता.

वाहतुकीची कोंडी

दक्षिण-पश्चिम नागपुरात अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. पडोळे चौकाकडून स्वावलंबीनगरकडे जाणारा मार्ग पूर्णत: बंद झाला होता. तर माटे चौकात झाडे पडल्यामुळे एकाच बाजूचा रस्ता सुरू होता.

पालिकेच्या तयारीचे निघाले वाभाडे

पहिल्याच पावसाने महापालिका प्रशासनाच्या कामांचे वाभाडे काढले. महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी संपूर्ण शहरामध्ये पावसाळापूर्व कामे केली जातात. यामध्ये नाले, ड्रेनेज सफाई, रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमधील गाळ, कचरा काढणे, रस्ते, फुटपाथ दुरुस्ती आदी विविध स्वरूपाची कामे केली जातात. मात्र ज्या प्रकारे काही ठिकाणी पाणी साचले ते पाहता मनपाच्या तयारीवरच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. रामदासपेठ, काचीपुरा मार्ग, सीताबर्डी येथील मुख्य रस्त्यांना तर तळ्याचे स्वरूप आले होते.