शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदाची पदभरती स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2016 03:14 IST

राज्य जलसंपदा विभागाच्या १ हजार २५६ कनिष्ठ अभियंता पदभरतीची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

‘बीई’च्या विद्यार्थ्यांना डावलले : इच्छुक उमेदवारांची न्यायालयात धावयोगेश पांडे नागपूर राज्य जलसंपदा विभागाच्या १ हजार २५६ कनिष्ठ अभियंता पदभरतीची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. या पदांसाठी विभागाकडून केवळ अभियांत्रिकी पदविका उमेदवारांचेच अर्ज मागविण्यात आले होते. यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करीत अभियांत्रिकी पदवीप्राप्त इच्छुक उमेदवारांनी राज्यातील विविध न्यायालयांमध्ये याविरोधात याचिका दाखल केल्या. संबंधित याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय आला नसल्यामुळे विभागाने हा निर्णय घेतला आहे. ‘लोकमत’नेच सर्वात अगोदर हे प्रकरण उचलून धरले होते.जलसंपदा व जलसंधारण विभागातील गट ‘ब’अंतर्गत येणाऱ्या १ हजार २५६ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदांच्या भरतीसाठी विभागाकडून जानेवारी महिन्यात जाहिरात देण्यात आली. राज्यस्तरीय सरळसेवा निवड समितीच्या वतीने महाआॅनलाईनच्या माध्यमातून २५ मार्च रोजी राज्यातील सहा विभागांतील जिल्हास्थानी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार होती.पदनिवडीसाठी स्थापत्य अभियांत्रिकीमधील तीन वर्षे कालावधीची पदविका आवश्यक असल्याची अट ठेवण्यात आली व यामुळे चार वर्षे ‘बीई’ (बॅचलर आॅफ इंजिनिअरिंग) केलेले उमेदवारांचे ‘आॅनलाईन’ अर्ज नाकारण्यात आले. ‘बीई’ही पदवी पदविकेपेक्षा जास्त दर्जाची असूनदेखील अशाप्रकारे डावलल्याविरोधात संतप्त इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातदेखील फिर्याद मांडली. यादरम्यान, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ व औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर अद्याप अंतिम सुनावणी झालेली नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानादेखील जर भरती प्रक्रिया राबविली तर अडचण निर्माण होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन संबंधित प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. उमेदवारांमध्ये संभ्रमदरम्यान, ही पदभरती स्थगित झाली असल्याबाबतदेखील उमेदवारांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. बहुतांश उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात याचिका मांडली व पदवी उमेदवारांनादेखील अर्ज भरू देण्याची परवानगी मागितली. या प्रक्रियेवर स्थगितीची कुठलीही मागणी केलेली नाही. मग कशाच्या आधारावर पदभरतीला स्थगिती देण्यात आली आहे, असा प्रश्न इच्छुक उमेदवारांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)