शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

१०० युनिटपर्यंत वीज बिल माफ होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 10:57 AM

ऊर्जा विभागाने दिलासा देणारे अनेक पर्याय मंजुरीसाठी राज्य विद्युत नियामक आयोगाकडे पाठविले आहे. त्याचवेळी लॉकडाऊनच्या काळातील १०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ व्हावे, यासाठी काँग्रेसचे मंत्री दबाव टाकत आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेसचे मंत्री टाकताहेत दबावमंत्रिमंडळात होणार निर्णयमहावितरणने आयोगाला पाठवला प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन ते चार महिन्याचे भरमसाट वीज बिल एकाचवेळी पाठवण्यात आल्याने राज्यभरातील नागरिक त्रस्त आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या मागच्या बैठकीत नागरिकांना दिलासा देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. ऊर्जा विभागाने दिलासा देणारे अनेक पर्याय मंजुरीसाठी राज्य विद्युत नियामक आयोगाकडे पाठविले आहे. त्याचवेळी लॉकडाऊनच्या काळातील १०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ व्हावे, यासाठी काँग्रेसचे मंत्री दबाव टाकत आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी यासंदर्भात पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. यादरम्यान झालेल्या चर्चेत लॉकडाऊन काळातील १०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करून नागरिकांना दिलासा देण्यात यावा, याबाबत मानस तयार करण्यात आले. ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मागणीसाठी दबाव निर्माण करतील.

दुसरीकडे महावितरणच्या सूत्रानुसार ऊर्जा विभागाने नियामक आयोगासमोर नागरिकांना दिलासा देण्यासाठी अनेक पर्यायांचा प्रस्ताव पाठविला आहे. यात १०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करणे, एकूण बिलावर सूट देणे यासारख्या पर्यायांचा समावेश आहे. महावितरणने स्पष्ट केले की, नागरिकांना दिलासा देण्याबाबत त्यांचा कुठलाही आक्षेप नाही. परंतु वीज बिलात जी काही सूट दिली जाईल, त्याचा भार राज्य सरकारने उचलावा. कंपनीची आर्थिक स्थिती मात्र दिलासा देण्यासारखी नाही, असे कंपनीचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :electricityवीज