शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी घेतला ‘हरविलेल्यांचा शोध’

By admin | Updated: July 10, 2015 03:06 IST

घरून कोणत्यातरी कारणामुळे निघून गेलेल्यांसोबतच पळविलेल्या आणि अनोळखी मृतांबाबतची ओळख पटविण्यासाठी ...

काटोलमध्ये मेळावा : ७३ व्यक्तींचा शोध लावण्यात पोलिसांना यशनागपूर : घरून कोणत्यातरी कारणामुळे निघून गेलेल्यांसोबतच पळविलेल्या आणि अनोळखी मृतांबाबतची ओळख पटविण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलिसांनी ‘मिसिंग मेळावा’ हा उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत अशाप्रकारे सावनेर, उमरेड आणि काटोलमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. त्याद्वारे ७३ व्यक्तींचा शोध घेण्यात नागपूर ग्रामीण पोलीस यशस्वी झाले. काटोल उपविभागांतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यातील केसेससंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी काटोलच्या शिंदे महिला महाविद्यालयात अशा प्रकारचा उपक्रम गुरुवारी राबविण्यात आला. याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्यासह काटोलचे उपविभागीय पोलीस अधिकारी मोरेश्वर आत्राम, काटोलचे ठाणेदार दिगांबर चव्हाण, नरखेडचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे, जलालखेड्याचे ठाणेदार दिनेश लबडे, कोंढाळीचे ठाणेदार पीतांबर जाधव, महिला तक्रार निवारण केंद्राच्या प्रमुख अनामिका मिर्झापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. वर्षभरात मिसिंग झालेले मुले-मुली, व्यक्ती तसेच खुनामधील व अपघातामध्ये अनोळखी व्यक्तींचा मृत्यू याबाबतचे छायाचित्र, शोधपत्रिकांचे प्रदर्शन मिसिंग मेळाव्यात लावण्यात आले होते. हरविलेल्या व्यक्तींचा तसेच इतर गुन्ह्यातील अनोळखी व्यक्ती आणि मृतांची ओळख पटविणे हा या मेळाव्याचे मुख्य उद्देश होता. काटोल विभागात येणाऱ्या काटोल, जलालखेडा, नरखेड, कोंढाळी या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मिसिंग झालेल्या व्यक्तींची माहितीही प्रदर्शित करण्यात आली होती. यामध्ये हरविलेले, पळविलेले, अनोळखी मृत यांची ओळख होण्यासाठी उपस्थित मेळाव्यामधील नातेवाईकांमार्फत ओळखण्याचा प्रयत्न करण्यात आला. काटोल पोलीस ठाण्यातील एकूण ३४ केसेसपैकी १७ केसेसचा शोध लागला. जलालखेडा पोलीस ठाण्यातील २४ पैकी १२, नरखेडमधील ७, कोंढाळीतील २ केसेसचा यावेळी शोध लागला. (प्रतिनिधी)