शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

उपराजधानीत सकाळी पोलिसांचा दंडुका, दुपारी सर्वत्र शांतता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 16:26 IST

संसर्गजन्य असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने २१ मार्च पासूनच नागपुरात ‘लॉकडाऊन’ केले आहे. तरीदेखील काही नागरिकांकडून उद्दामपणा दाखविला जात आहे .

ठळक मुद्देसमाजसेवकांनी केले चहा, पाण्याचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या प्रकोपाला टोलवून लावण्यासाठी राज्यात ‘लॉकडाऊन’ सोबतच कलम १४४ लागू झाली आहे. सरकारच्या दिशानिर्देशाकडे कानाडोळा करून बाहेर पडणाऱ्यामस्तवाल नागरिकांना मंगळवारी पोलीसांच्या दंडूक्याचा सामना करावा लागला. दुपारपर्यंत हादंडूका इतका गाजला की दुपारपासून सर्वत्र शांतता नांदलेली दिसली.संसर्गजन्य असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने २१ मार्चपासूनच नागपुरात ‘लॉकडाऊन’ केले आहे. तरीदेखील काही नागरिकांकडून उद्दामपणादाखविला जात आहे आणि व्यवस्थेची खिल्ली उडविण्याचा प्रकार सुरू असल्यानेनाईलाजाने राज्यसरकारला संपूर्ण राज्यात कलम १४४ सुरू करावी लागली. त्यामुळे संपूर्णपोलीस यंत्रणा सज्ज झाली. तरी देखील पूर्व नागपुरातील काही भागात सकाळी नागरिकांनीबाहेर पडण्यास सुरुवात केली. प्रारंभी पोलीसांनी शांतपणाने त्यांना मागे वळण्यास सांगितले.त्यावरही काही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसलेल्यांना पोलीसांना दंडूक्याचा उपयोग करावालागला. पोलीसांचा रोष बघून नंतर कोण्याही नागरिकाची घराबाहेर पडण्याची हिंमत झालीनाही. अशाही परिस्थितीत खरबी चौक, दीघोरी चौक, मोठा ताजबाग, हसनबाग येथे भरउन्हात आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीसांना काही नागरिकांनी आपली सेवा पुरविली. चामटचौकात चहाची टपरी चालविणाऱ्या जैन कुटूंबाने पोलीसांना चहा, पाणी, नाश्ता पाठवूनसामाजिक कर्तव्यात सहभाग दिला. योगिता जैन यांनी आपली मुले यश व जान्हवी यांच्यासोबत ही सेवा पुरवली तर वाठोडा येथील कार्यकर्ते बंटी रहांगडाले, अक्षय सुदामे, विशाल नागपूरे,शाहीद शेख, नयन मेश्राम यांनी पूर्व नागपुरातील प्रत्येक पोलीस असलेल्या चौकात चहा, नाश्ता व पाण्याची सेवा पुरवली. यावेळी भाजीविके्रत्यांना पोलीसांनी चौक सोडून आपले दुकानलावण्याची परवानगी दिली. चौकात अकारण गर्दी होऊ नये, हा उद्देश यामागचा असल्याचेपोलीसांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस