शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाणे की आखाडा?

By admin | Updated: May 19, 2014 00:40 IST

कळमना ठाण्यातील हवालदाराला त्याच्याच एका सहकार्‍याने पत्नी आणि मुलांच्या मदतीने झोडपून काढले. सायंकाळी ६ वाजता अचानक घडलेल्या या घटनेची पोलीस विभागात एकच चर्चा होती

 हवालदाराची धुलाई : सहकार्‍यानेच घेतला बदला

नागपूर : कळमना ठाण्यातील हवालदाराला त्याच्याच एका सहकार्‍याने पत्नी आणि मुलांच्या मदतीने झोडपून काढले. सायंकाळी ६ वाजता अचानक घडलेल्या या घटनेची पोलीस विभागात एकच चर्चा होती. कळमना पोलीस ठाण्यात हवालदार नागोराव इंगळे हे गुप्तचर शाखेचे प्रभारी आहेत तर हवालदार मेघराज तरडे हे आलेल्या तक्रारी व निवेदने तपासण्याचे काम पाहतात. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. या वादाबद्दल अधिकारी आणि कर्मचार्‍यांनाही माहिती आहे. रविवारी सायंकाळी ५.४५ वाजता इंगळे आपली पत्नी आणि दोन मुलांसोबत कळमना ठाण्यात पोहोचला. त्यावेळी तरडे त्याच्या हाती लागला. इंगळेने लाथा-बुक्क्यांनी त्यला मारहाण केली. तरडेसुद्धा पूर्ण ताकदीने त्याचा मुकाबला करू लागला. तरडे इंगळेवर भारी पडत असल्याचे पाहून इंगळेची पत्नी आणि मुले त्याच्या मदतीसाठी धावले. तिघेही मिळून तरडेला झोडपू लागले. महिलेच्या हातून मार खावा लागत असल्याने तरडे बचावाच्या पवित्र्यात आला. तरडे विरोध करीत नसल्याने इंगळेची पत्नी आणखी उग्र झाली. ठाण्यामध्ये उपस्थित डे आॅफिसर बालाजी वैद्य यांच्या समोरच तरडेला झोडपून काढले. इंगळेच्या पत्नीचे रौद्र रूप पाहून अधिकारी कर्मचार्‍यापैकी कुणीही मध्यस्ती केली नाही. १५ मिनिटे मारहाण सुरू होती. यावेळी ठाण्यात काही नागरिकही उपस्थित होते. पाहता पाहता या घटनेची माहिती शहरातील इतर पोलीस ठाणे आणि वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत पोहोचली. सर्वांकडून फोन येऊ लागले. परंतु प्रकरण इथेच संपविण्याच्या अपेक्षेने कळमना पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी सुरुवातीला काहीच प्रतिसाद दिला नाही. परंतु वरिष्ठ अधिकार्‍यांचे फोन येताच कळमना पोलीस धावपळ करू लागले. इंगळेच्या पत्नीने तरडे याने दारूच्या नशेत आपत्तीजनक व्यवहार केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर तरडेला वैद्यकीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले. देवाण-घेवाणवरून दोघांमध्ये वाद सुरू असल्याची चर्चा आहे. दोघांकडे ठाण्यातील महत्त्वाची जबाबदारी आहे. खिसे गरम करण्याची संधी त्यांना नेहमीच येत असते. अशाच एका प्रकरणावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. ठाण्यात झालेली मारहाण त्याचाच परिणाम असल्याची चर्चा आहे. सूत्रानुसार तरडे याला काही दिवसांपूर्वी आलेल्या तक्रारीच्या तपासण्याच्या कामावरून हटविण्यात आले होते. नुकतेच त्याला हे काम देण्यात आले. त्याचप्रकारे काही दिवसांपूर्वी एका उपनिरीक्षकाने इंगळेच्ी तक्रार नोंदविली होती. त्यासाठी सहायक पोलीस आयुक्तांसमोर त्याची पेशी सुद्धा झाली होती. सहायक पोलीस आयुक्तांनी तक्रारीचा तपास करून आपला अहवाल झोन तीनचे उपायुक्त संजय दराडे यांच्याकडे पाठविला आहे. कळमना ठाणे काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. (प्रतिनिधी)