शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीत तोतयागिरी

By admin | Updated: March 24, 2017 00:40 IST

उस्मानाबाद : पोलीस भरती प्रक्रियेत भावाला मदत करण्यासाठी तोतयागिरी केल्याप्रकरणी एकाविरूध्द आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

उस्मानाबाद : पोलीस भरती प्रक्रियेत भावाला मदत करण्यासाठी तोतयागिरी केल्याप्रकरणी एकाविरूध्द आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना २३ मार्च रोजी सकाळी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर घडली़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया सुरू आहे़ भरती प्रक्रियेदरम्यान गुरूवारी सकाळी कार्यरत असलेले स्थागुशाचे पोनि हरिष खेडकर, सपोनि हातमोडे, सानप, पोउपनि लोंढे, पवार, ढाकणे हे अलंकार हॉल समोरील बाजूस होते़ त्यावेळी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारातून एका दुचाकीवर आलेल्या युवकाच्या हलचालीवरून त्यांना त्याचा संशय आला़ उपस्थित अधिकाऱ्यांनी युवकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने स्वत:चे नाव प्रकाश सुदाम सावंत (वय-२५ रा़ शिवाजीनगर सांजा रोड, उस्मानाबाद) असे सांगितले़ त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचा भाऊ विजय सुदाम सावंत याने व त्याच्या मित्राने पोलीस भरती प्रक्रियेत अर्ज केल्याचे व त्याची आज मैदानी चाचणी असल्याचे समोर आले़ पोलिसांच्या अधिक चौकशीत प्रकाश सावंत हा अयोग्य माहिती देत असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले़ या प्रकरणी स्थागुशाचे पोनि हरिष खेडकर यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, तोतयागिरी करून प्रवेश आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रकाश सुदाम सावंत याच्याविरूध्द आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सुदरील प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नारनवरे या करीत आहेत़