शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

सदरमधील हॉटेलवर पोलिसांचा छापा

By admin | Updated: June 1, 2015 02:40 IST

गैरप्रकाराच्या तक्रारी मिळाल्यामुळे पोलिसांनी सदरमधील हॉटेल हेरिटेजवर शनिवारी मध्यरात्री छापा घातला.

कारवाईचा गोलमाल : उलटसुलट चर्चेला उधाणनागपूर : गैरप्रकाराच्या तक्रारी मिळाल्यामुळे पोलिसांनी सदरमधील हॉटेल हेरिटेजवर शनिवारी मध्यरात्री छापा घातला. तेथे पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केली. मात्र, पोलिसांना चौकशीत या हॉटेलमध्ये काय आढळले ते स्पष्ट होऊ शकले नाही. दुसरीकडे सेंट्रल एव्हेन्यूवरील एका हॉटेलमध्ये शनिवारी मध्यरात्री दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची चर्चा आहे. पोलिसांनी मात्र त्याचा इन्कार केला. गुन्हेशाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये गैरप्रकार सुरू असतात, अशा तक्रारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाल्या. त्यानुसार, पोलिसांचा मोठा ताफा शनिवारी मध्यरात्री हॉटेल हेरिटेजमध्ये शिरला. हाऊस आॅफ बीअर (एचओबी) सह हॉटेलच्या आतबाहेर मध्यरात्री दीडपर्यंत पोलिसांनी कसून तपासणी केली. पोलिसांचा एवढा मोठा ताफा पाहून आजूबाजूलाही गर्दी झाली. मात्र, नंतर काय कारवाई झाली ते रविवारी रात्रीपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत वारंवार चौकशी करूनही पोलिसांकडून माहिती देण्याचे टाळले जात होते. दुसरीकडे शहरात वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होती. टेरेसवर गोंधळ आणि मारहाणीचा प्रकार घडल्याचीही चर्चा होती. पोलिसांनी मात्र याबाबत काही बोलण्याचे टाळले. कारवाईत सहभागी असलेले अधिकारी वरिष्ठांशी बोला, असे सांगत होते. तर, ‘संबंधित वरिष्ठांचे मोबाईल नो रिप्लाय‘ होते. सदर पोलिसांकडे विचारणा केली असता चलान कारवाईची नोंद असल्याचे त्यांनी सांगितले. यापेक्षा अधिक काही सांगता येणार नसल्याचे सदर ठाण्यातील कर्मचारी म्हणाले. दुसरीकडे सेंट्रल एव्हेन्यूवरील एका हॉटेलच्या हुक्का पार्लरमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याचे वृत्त होते. पोलिसांनी मात्र त्याचा इन्कार केला. (प्रतिनिधी)