शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
3
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
4
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
5
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
6
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
7
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
8
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
9
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
10
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
11
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
12
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
13
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
14
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत तोतया पोलिसांचा धुमाकूळ

By admin | Updated: March 16, 2015 02:29 IST

पोलीस असल्याची बतावणी करून सांगून शनिवारी सकाळी साडेतीन तासात पाच ज्येष्ठ नागरिकांना लुटल्याची घटना घडली.

नागपूर : पोलीस असल्याची बतावणी करून सांगून शनिवारी सकाळी साडेतीन तासात पाच ज्येष्ठ नागरिकांना लुटल्याची घटना घडली. शहराच्या विविध भागात घडलेल्या या घटनांमुळे पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सर्व घटनात अज्ञात आरोपींनी दोन महिलांसह पाच ज्येष्ठ नागरिकांचे १ लाख ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पळविले आहेत.शनिवारी सकाळी ७.१५ वाजता पहिली घटना अंबाझरीच्या शिवाजीनगर गार्डनजवळ घडली. हिल रोड गोकुळपेठ येथील रहिवासी एल. सुब्रमण्यम (७४) मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. त्यांना गार्डनच्या मागील दारावर दोन बाईकस्वारांनी पोलीस असल्याचे सांगून थांबविले. आरोपींनी पुढील चौकात दंगा सुरू केला असल्याची माहिती देऊन त्यांच्या जवळील ३२ हजार रुपये किमतीची अंगठी आणि चेन काढून कागदात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी त्यांची नजर चुकवून दागिने घेऊन पसार झाले. दुसरी घटना प्रतापनगरच्या डॉ. देशपांडे हॉस्पिटलसमोर सकाळी ७.५० वाजता घडली. जयताळा रोडवरील रचना अंगन अपार्टमेंट येथील रहिवासी वसंता विनायक लाजूरकर (७५) सकाळी डॉ. किरणकर यांच्या पॅथॉलॉजीकडे पायी जात होते. दरम्यान त्यांना काळ्या रंगाची बाईक क्रमांक एम. एच. ३१, ९०८० वर आलेले दोन युवक भेटले. आरोपींनी आपण पोलीस असल्याचे सांगून समोरील घरात चोरट्यांनी ४ लाखाचे दागिने लुटल्याची माहिती दिली. आरोपींनी त्यांना त्यांची चेन रुमालात ठेवून घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना रुमाल बांधुन देण्याच्या बहाण्याने दागिने घेऊन पळ काढला. तिसरी घटना सकाळी ८.३० वाजता प्रतापनगरच्या पडोळे चौकात घडली. गोपाळनगरचे रहिवासी निमिचंद बिहारीलाल जैन (६१) पायी पडोळे चौक ते गोपालनगरकडे जात होते. दरम्यान आसिफ मोबाईल शॉपीसमोर त्यांना दोन बाईकवर आलेल्या चौघांनी थांबवून आपण पोलीस असून समोरील चौकात अपहरण होण्याची भीती असल्याचे सांगितले. त्यानंतर जैन यांना सोन्याचे दागिने काढून रुमालात ठेवण्यास सांगितले. त्यावर त्यांची नजर चुकवून आरोपींनी ३२ हजाराचे दागिने घेऊन पळ काढला. चौथी घटना लकडगंजच्या सतनामीनगर परिसरात सकाळी १०.१५ वाजता घडली. कृष्णाबाई टेकचंद पोपळी (८५) मंदिरातून पूजा करून बाहेर निघाल्या. चार युवकांनी त्यांना थांबवून कथित पूजा शर्मा हिचे दागिने लुटल्याची माहिती देऊन ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीला आलो असल्याचे सांगितले. त्यानंतर कृष्णाबाईच्या बांगड्या आणि दागिने काढून कागदात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी नजर चुकवून त्यांचे ५० हजाराचे दागिने घेऊन पळ काढला. तर पाचवी घटना धंतोलीच्या इंडियन जिमखान्यासमोर सकाळी १०.४५ वाजताच्या दरम्यान घडली. तकीया धंतोली येथील रहिवासी सुचित्रा वसंत जोशी (६०) पायी नागपूर नागरिक सहकारी बँकेत जात होत्या. राव बंगल्यासमोर तीन आरोपींनी त्यांना आपण पोलीस असल्याचे सांगून थांबविले. त्यांनी या महिलेस गोष्टीत मग्न करून त्यांचे ३० हजाराचे दागिने घेऊन पळ काढला. दरम्यान दागिने लुटल्यानंतर संबंधित नागरिकांनी आपापल्या परिसरातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.