शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

एमडी तस्कर आबूच्या नेटवर्कमध्ये पोलिसही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:24 AM

मध्य भारतातील खासमखास समजला जाणारा एमडी तस्कर आबू फिरोज खान याच्या नेटवर्कमध्ये अनेक पोलीस कर्मचारीही सहभागी असल्याचे खळबळजनक वास्तव पोलीस तपासात अधोरेखित झाले आहे.

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक वास्तव उघड डिफॉल्ट रिपोर्ट वरिष्ठांकडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई, गोवाच नव्हे तर दुबई, बँकॉकसह विदेशातील अमली पदार्थाच्या तस्करांचा मध्य भारतातील खासमखास समजला जाणारा एमडी तस्कर आबू फिरोज खान याच्या नेटवर्कमध्ये अनेक पोलीस कर्मचारीही सहभागी असल्याचे खळबळजनक वास्तव पोलीस तपासात अधोरेखित झाले आहे.विशेष म्हणजे, आबूला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्यानंतर त्याच्या अमली पदार्थाच्या तस्करीत अनेक पोलीस कर्मचारी महत्त्वाची भूमिका वठवीत असल्याचे लोकमतने प्रकाशित केले होते. गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त संभाजी कदम यांनी आबूच्या संपर्कात तब्बल १० पोलीस कर्मचारी सहभागी असल्याचे सांगून, लोकमतच्या वृत्तावर मोहोर उमटविली आहे. गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने ६ जानेवारीला आबूचा साथीदार जावेद ऊर्फ बच्चा अताउल्ला खान (वय ३५) आणि अरशद अहमद या दोघांना अटक करून त्यांच्याकडून पावणेदोन लाखांची एमडी पावडर जप्त केले होते. अत्यंत महागडे असे हे एमडी पावडर आबूच्या सांगण्यावरूनच स्मगलिंग करीत असल्याचे बच्चाने पोलिसांना सांगितले. त्यावरून १० जानेवारीला पोलिसांनी आबूच्या मुसक्या बांधल्या. त्याला अटक केल्यानंतर पोलीस कोठडी मिळवून पोलिसांनी सविस्तर चौकशी केली. सध्या आबू कारागृहात आहे.मात्र, त्याच्या चौकशीत त्याच्या संपर्कात शहरातील अनेक पोलीस कर्मचारी, अधिकारी असल्याचे उघड झाले. नुसता संपर्कच नव्हे तर आबूकडे तीन ते चार जणांची बैठकच होती, ते त्याच्याकडून फुकट एमडी घेत होते आणि त्याबदल्यात त्याला पोलिसांकडून कारवाई होणार नाही, याबाबत वेळोवेळी मदत करीत होते, असेही तपासात उघड झाले आहे. अशापैकी आबूकडे बैठक मांडणाऱ्या १० पोलिसांची नावे उघड झाली; त्यांचा डिफॉल्ट रिपोर्ट तयार करण्यात आल्याचेही उपायुक्त कदम यांनी पत्रकारांना सांगितले.वरिष्ठ घेणार निर्णयअमली पदार्थ तस्करी करणाऱ्याच्या अड्ड्यावर बैठक जमविणाऱ्या पोलिसांची नावे आणि त्यांचा डिफॉल्ट रिपोर्ट वरिष्ठांकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर कोणती कारवाई करायची, याचा निर्णय वरिष्ठच घेणार असल्याचे उपायुक्त कदम यांनी सांगितले. विशेष म्हणजे, उपरोक्त धक्कादायक बाब उपायुक्त कदम यांनी पत्रकारांना सांगितली आणि त्याचवेळी डिफॉल्ट रिपोर्ट असणाºया एका वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याला गुन्हे शाखेत संलग्न करण्यात आल्याचेही वृत्त व्हायरल झाले. त्यामुळे वरिष्ठांनी त्यालाकारवाई करण्याऐवजी एमडी तस्कराच्या सोबतीची बक्षिसी दिली काय, असा प्रश्न चर्चेला आला आहे.

टॅग्स :Policeपोलिस