पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:08 IST2021-03-14T04:08:21+5:302021-03-14T04:08:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधवेशी लग्न करून तिचे शारीरिक शोषण केल्यानंतर फरार झालेल्या पोलीस निरीक्षक अरविंद भोळेविरुद्ध अखेर ...

Police inspector charged with rape | पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल

पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विधवेशी लग्न करून तिचे शारीरिक शोषण केल्यानंतर फरार झालेल्या पोलीस निरीक्षक अरविंद भोळेविरुद्ध अखेर गिट्टीखदान पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपासून फरार असलेल्या भोळेला पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज निलंबित केले.

पीडित महिला अमरावतीतील मूळ रहिवासी असून २०१० मध्ये तिच्या पतीच्या मृत्यूनंतर ती एकाकी झाली होती. २६ जानेवारी २०१९ मध्ये फेसबुकवर तिची भोळेसोबत ओळख झाली. ते फेसबुकवर संपर्कात होते. चॅटिंगच्या दरम्यान भोळेने तिला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्या मुलाचाही स्वीकार करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे महिलासुद्धा लग्नासाठी तयार झाली. ८ नोव्हेंबर २०२० रोजी आर्वी (जि. वर्धा) जवळच्या श्रीक्षेत्र काैंडण्यपूला त्यांनी लग्न केले. त्यानंतर ते नंदनवनमध्ये भाड्याने राहू लागले. नंतर भोळेच्या संपर्कातील महिला भेटीला येऊ लागल्याने महिलेेने चाैकशी केली असता तो आधीच विवाहित असल्याचे उघड झाले. त्यामुळे तिने त्याला धारेवर धरले. त्यानंतर हे दोघे गिट्टीखदानमधील फ्रेण्ड्स कॉलनीत एका फ्लॅटमध्ये राहू लागले. हा फ्लॅट भोळेच्या एका पोलीस अधिकारी मित्राचा होता. तिकडच्या एका दलालाने तो मिळवून दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर भोळेचे अनेक महिलांसोबत संबंध असल्याचे उघड झाल्याने या दोघांमधील वाद टोकाला गेला. या पार्श्वभूमीवर, महिलेने काही पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन भोळेच्या लीला त्यांना ऐकवल्या. ४ मार्चला लोकमतने हे प्रकरण प्रकाशित केल्यानंतर भोळे गायब झाला. त्याने तिचा मोबाईल नंबरही ‘ब्लॉक’ केला. दरम्यान, वैफल्यग्रस्त झालेल्या महिलेने शुक्रवारी इकडे तिकडे फोन मेसेज करून आपली व्यथा ऐकवली. तिची मन:स्थिती लक्षात घेत काहींनी हा प्रकार पोलीस आयुक्तांच्या लक्षात आणून दिला. आयुक्तांनी लगेच गिट्टीखदान पोलिसांना भोळेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक भोळेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.

----

आजारी रजेच्या नावाखाली फरार

भोळे सध्या आजारी रजेवर आहे. कारवाईच्या भीतीपोटी त्याने आजारी रजेचा पर्याय निवडला असला तरी त्याच्या प्रकरणाचा बोभाटा झाल्याने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शनिवारी सायंकाळी त्याच्या निलंबनाचा आदेश काढला. विशेष म्हणजे, भोळे यापूर्वी नंदनवन ठाण्यात कार्यरत होता. त्यावेळी ‘लुटेरी दुल्हन’सोबत त्याचे नाव जुळले होते. भारतीच्या नावावर दोन लाखाची तोडीही लुटेरी दुल्हनने केली होती.

Web Title: Police inspector charged with rape