शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

बडतर्फ पोलीस शिपायी जयंता शेलोटला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुख्यात गुन्हेगार तसेच ड्रग माफियांसोबत वेळोवेळी कनेक्शन उघड झाल्याने पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आलेला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कुख्यात गुन्हेगार तसेच ड्रग माफियांसोबत वेळोवेळी कनेक्शन उघड झाल्याने पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आलेला शिपायी जयंता गोविंदराव शेलोट (वय ४४) आणि त्याचा भाऊ विजय (वय ४६) या दोघांना बुधवारी रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने खंडणी वसुलीच्या आरोपाखाली अटक केली. या दोघांना न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्यांचा चार दिवसांचा पीसीआर मिळवला. या घडामोडीमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

तक्रारकर्ता मनीष भिवाजी राऊत (वय ३१, रा. स्वावलंबीनगर) प्रॉपर्टी डिलर आहे. २०१६ मध्ये व्यवहार फसल्याने राऊतची आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे त्यावेळी त्याने जयंता आणि त्याच्या भावाकडून चार लाख रुपये व्याजाने घेतले होते. महिन्याला १० टक्के व्याज ठरले होते. त्यानुसार, राऊतने शेलोटला वर्षभरात ७ लाख, २० हजार रुपये दिले. त्यानंतरही आरोपी शेलोटने चक्रवाढपद्धतीला लाजवेल अशा पद्धतीने व्याजाची आकारणी करून ५ वर्षांत ४ लाखांच्या बदल्यात १ कोटी, ३ लाख रुपयांचा हिशेब काढला. तुझ्याकडे ९७ लाख रुपये शिल्लक आहेत, असे सांगून आरोपी शेलोट बंधू राऊतला धमकावू लागले. २१ जानेवारी ते २८ जानेवारीच्या कालावधीत त्यांनी अजनीच्या भगवाननगरातील आपल्या फेब्रिकेशनच्या दुकानात बोलवून राऊतला बेदम मारहाण केली. ९७ लाख रुपये वसूल करण्यासाठी त्यांनी राऊतला वडिलोपार्जित घर विकण्यासाठी कागदपत्रे आणून देण्यास सांगितले. आरोपी जयंता शेलोटची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता ते आपल्या घरावर कब्जा मारू शकतात, हे लक्षात आल्यामुळे राऊतने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली. त्यामुळे बुधवारी चाैकशीची चक्रे वेगात फिरली. आरोपी जयंता आणि त्याचा भाऊ विजय शेलोट या दोघांना बुधवारी रात्री गुन्हे शाखेच्या युनिट चारचे एपीआय विजय कसोधन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ताब्यात घेऊन अजनीचे ठाणेदार विनोद चाैधरी यांच्या हवाली केले. चाैधरी यांनी आज जयंता आणि विजयला न्यायालयात हजर करून त्यांचा चार दिवसांचा पीसीआर मिळवला.

---

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर फिरले वासे

पोलीस दलात कार्यरत असताना जयंताचा कर्मचारीच नव्हे तर पोलीस अधिकाऱ्यातही प्रचंड दबदबा होता. गुन्हेगारी वर्तुळात जबरदस्त नेटवर्क असल्याने कोणत्याही गुन्ह्यातील आरोपी शोधून काढायचे असतील तर ठिकठिकाणचे पोलीस अधिकारी आधी जयंताची मदत घेत होते. त्यामुळे जयंताने वेगळी वाट पकडली. तो गुन्हेगारांमध्ये रमला. मध्य भारताचा सर्वात मोठा ड्रग माफिया आबू खान आणि अन्य गुन्हेगारांसोबत ‘तेरे जैसा यार कहां’ या गाण्यावर नाचताना जयंताचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे जयंताचे वासे फिरले. त्याला निलंबित करण्यात आले. सेवेत रुजू झाल्यानंतरही त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने आणि त्याच्यावर अनेक गंभीर आरोप झाल्याने तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी त्याला पोलीस दलातून बडतर्फ केले होते. त्यानंतर जयंता अवैध सावकारी तसेच खंडणी वसुलीत सक्रिय झाल्याचे या प्रकरणातून उघड झाले आहे.

----