शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींना पोलिसांचे अभय ?

By admin | Updated: November 3, 2015 03:25 IST

सदनिका मालकाला सहा लाखांचा गंडा घालण्याच्या प्रयत्नात त्याची आणि प्रशासनाचीही दिशाभूल करणाऱ्या आरोपींना अटक

नागपूर : सदनिका मालकाला सहा लाखांचा गंडा घालण्याच्या प्रयत्नात त्याची आणि प्रशासनाचीही दिशाभूल करणाऱ्या आरोपींना अटक करण्यासाठी जरीपटका पोलीस टाळाटाळ करीत आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणात न्यायालयाने आदेश दिल्यामुळे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, दोन आठवडे होऊनही पोलिसांनी आरोपीला अटक केलेली नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.संदीप रघुनाथ ठवरे (वय ४२) हे जरीपटक्यातील मिसाळ लेआऊटमध्ये राहातात. आशय अपार्टमेंटमधील ठवरे यांची सदनिका आरोपी अमोल आणि त्यांचे वडील टिकेश्वर गौतमराव गोटेकर यांनी खरेदी केली. १२ लाखात सौदा झाल्यानंतर सहा लाख धनादेशाद्वारे देण्यात आले. उर्वरित सहा लाख मात्र नमूद कालावधी होऊनही गोटेकर यांनी ठवरेंना दिले नाहीत. त्यामुळे हे करारपत्र रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यावर गोटेकर यांनी रक्कम दिल्याचे भासवण्यासाठी बनावट पावती तयार केली. त्यावर ठवरेंची सही केली. ही बनावट कागदपत्रे ग्राहक न्यायालयात सादर करण्यात आली. आपली रक्कम हडपण्यासाठी गोटेकर यांनी बनावट कागदपत्रे तयार करून धोकेबाजी केल्याचे लक्षात आल्यामुळे ठवरेंनी जरीपटका पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ठवरेंनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे त्यांची फसवणूक झाल्याचा निष्कर्ष काढत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यामुळे जरीपटका पोलिसांनी कोर्टाच्या आदेशावरून संदीप ठवरेंची तक्रार नोंदवून घेतली. फसवणुकीच्या ४२० कलमासह आरोपी अमोल आणि त्यांचे वडील टिकेश्वर गोटेकर यांच्यााविरुद्ध १५ आॅक्टोबरला गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही. (प्रतिनिधी)टाळाटाळ कशासाठी?४आधी गुन्हा दाखल करण्यासाठी आणि आता आरोपींना अटक करण्यासाठी जरीपटका पोलीस टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पोलीस ही टाळाटाळ कशासाठी करीत आहेत, ते कळायला मार्ग नाही. यासंदर्भात जरीपटका पोलिसांकडे विचारणा केली असता चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.