शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

लेडी चिटरच्या किस्स्यांमुळे पोलीसही चक्रावले

By admin | Updated: October 24, 2016 02:53 IST

लेडी चिटर पूजा ठक्कर ऊर्फ पूजा खान हिच्या चौकशीतून पुढे आलेल्या किस्स्यांमुळे येथील पोलीस अधिकारी चक्रावले आहेत.

मुंबई, मसुरीतही फसवणूक : सारे काही ऐषोआरामासाठी नागपूर : लेडी चिटर पूजा ठक्कर ऊर्फ पूजा खान हिच्या चौकशीतून पुढे आलेल्या किस्स्यांमुळे येथील पोलीस अधिकारी चक्रावले आहेत. स्वत:ला जज, आयपीएस, आयएएस अधिकारी सांगून ती विविध महानगरात राहून ऐशोआरामाचे जीवन व्यतीत करीत असल्याचे उघड झाले. तिच्या या सवयीमुळे तिच्यावर मुंबई आणि मसुरीत गुन्हेही दाखल असल्याचे पोलीस सांगत आहे. मूळची पुण्यातील रहिवासी असलेल्या पूजाने अनेक दिवसांपासून ठाण मांडून हॉटेल सेंटर पॉर्इंट प्रशासनाच्या नाकीनऊ आणले होते. ती बिल देण्याचे आणि हॉटेल सोडण्याचे नाव घेत नसल्याने हॉटेल प्रशासनाने तिची सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तिची विचारपूस केली असता तिने स्वत:ला आधी आयएएस आणि नंतर आयपीएस अधिकाऱ्याची पत्नी असल्याचे सांगितले. इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेवर असलेले पूजाचे प्रभुत्व आणि तिची बोलण्याची शैली पोलिसांवर दडपण आणणारी ठरली. आपण अमेरिकेतील हॉवर्ड युनिव्हर्सिटीची पदवीधारक आहोत. आपला भाऊ यूएसमध्ये मोठ्या पदावर कार्यरत असून, आपल्या मागेपुढे आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे भक्कम पाठबळ आहे. तुम्ही कारवाई केल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी पूजाने दिल्यामुळे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेत तिची सावधगिरीने माहिती काढणे सुरू केले.(प्रतिनिधी) फेसबुकवरून पोलखोल तिच्या फेसबुकवर असलेल्या माहितीवरून ती खोटी बोलत असल्याचे स्पष्ट झाले. तिने मुंबईला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक केल्याचे तर उत्तराखंड मसुरीला प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांसाठी असलेल्या अतिथीगृहात मुक्काम ठोकल्याचे आणि त्यामुळे तेथेही तिच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे कळताच पोलिसांनी तिची धिटाईने चौकशी सुरू केली. असा झाला भंडाफोडतिने ए. ए. खान (वय ७५) या निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यासोबत जुलै २०१६ मध्ये लग्न केल्याचे पोलिसांना सांगितले. हे सांगतानाच स्वत:चे वय ५७ वर्षे सांगितले.तिचे पॅनकार्ड तपासले असता त्यावर तिचे वय २७ वर्षे होते. ही एकूणच विसंगत माहिती पुढे आल्यानंतर तिने पुण्याहून आणलेल्या टॅक्सीचालकाची पोलिसांनी चौकशी केली अन् खुद्द पोलीसही चक्रावले. पूजाने त्या टॅक्सीचालकाला अन् हॉटेलमध्ये सलून चालविणाऱ्या एका महिलेलाही चुना लावल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी तिला शुक्रवारी अटक केली. तिला आज कोर्टात हजर केले असता कोर्टाने तिची व्यक्तीगत जात मुचलक्यावर सुटका केली.