शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक कंपनीला आग

By admin | Updated: June 4, 2015 02:28 IST

स्थानिक डोंगरगाव एमआयडीसी(महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ)तील प्लास्टिक कंपनीला आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.

काटोल एमआयडीसीतील घटना : चार तासानंतर आग आटोक्यातकाटोल : स्थानिक डोंगरगाव एमआयडीसी(महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ)तील प्लास्टिक कंपनीला आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. त्यात यंत्र आणि इतर सहित्य असे एकूण अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बुधवार असल्याने कंपनी बंद होती. परिणामी कामगार कामावर नव्हते, अन्यथा जीवितहानी झाली असती. आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. प्रेशियस ओरॅपॅक इंडस्ट्रिज असे नुकसान झालेल्या कंपनीचे आणि पृथ्वी अवतारसिंग मक्कड असे नुकसानग्रस्त मालकाचे नाव आहे. २०१२ पासून ती डोंगरगाव एमआयडीसीत सुरू आहे. तेथे सद्यस्थितीत २० कामगार काम करतात. या कंपनीत वायर गुंडाळण्यासाठी उपयोगात येणारी प्लास्टिक चक्री बनविण्याचे काम केले जाते. बुधवारी दुपारच्या सुमारास या कंपनीतून धूर येताना काही नागरिकांना दिसला. याबाबत लगेच कामगारांना माहीत होताच त्यांनी मालकाचा मुलगा गौरवजितसिंग यांना माहिती दिली. त्यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. आगीची तीव्रता पाहता काटोल नगर पालिकेच्या अग्शिनमन दलासह कळमेश्वर, नरखेडच्या दलासही सूचना देण्यात आली. तब्बल चार तासानंतर सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीची माहिती मिळताच काटोलचे तहसीलदार सचिन गोसावी, नायब तहसीलदार रमेश कोळपे, मंडळ अधिकारी मुन्ना मिश्रा, तलाठी राखी महाजन, पोलीस उपनिरीक्षक दीपक मस्के, प्रदीप पडोळे, कैलास उईके, रत्नाकर ठाकरे आदी हजर झाले. आग कशामुळे लागली, याचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.आगीत तेथील कच्चा माल, यंत्रसामुग्री खाक झाली. (तालुका / प्रतिनिधी)- तर अनर्थ झाला असता!आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या या कंपनीत २० कामगार काम करतात. प्लास्टिकच्या चक्री तेथे तयार करण्यात येतात. बुधवारी एमआयडीसीतील बहुतांश कंपन्या बंद असतात. ही कंपनीसुद्धा बंद होती. या कंपनीत आग लागली त्यावेळी कुणीही नव्हते. बुधवार व्यतिरिक्त इतर दिवशी कामाच्या वेळात आग लागली असती तर मोठी जीवितहानी झाली असती. मात्र थोडक्यात मोठा अनर्थ टळला.