भांगे लॉनच्या संचालकाकडून पिस्तूल जप्त

By Admin | Updated: April 16, 2016 02:19 IST2016-04-16T02:19:44+5:302016-04-16T02:19:44+5:30

प्रतापनगरातील भांगे लॉनचे संचालक पुरुषोत्तम नारायणराव भांगे (वय ६२) आणि महेश खंडेलवाल (वय ४०) या दोघांकडून पोलिसांनी ...

Pistol seized from the owner of the cannon lawn | भांगे लॉनच्या संचालकाकडून पिस्तूल जप्त

भांगे लॉनच्या संचालकाकडून पिस्तूल जप्त

साथीदाराजवळ आढळला कट्टा : प्रतापनगर ठाण्यात कारवाई
नागपूर : प्रतापनगरातील भांगे लॉनचे संचालक पुरुषोत्तम नारायणराव भांगे (वय ६२) आणि महेश खंडेलवाल (वय ४०) या दोघांकडून पोलिसांनी गुरुवारी रात्री एक पिस्तूल आणि एक देशी कट्टा तसेच १२ जिवंत काडतूस जप्त केले.
भांगे लॉन समोर गुरुवारी रात्री आईस्क्रीम वाटपाचा कार्यक्रम सुरू होता. तेथून एक रॅली जात होती. रॅलीतील तरुणांना भांगेजवळ पिस्तुल दिसल्याने तरुणांनी प्रतापनगर ठाण्यात माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी रात्री ११ वाजता भांगे तसेच खंडेलवालला पिस्तूल तसेच कट्ट्यासह ताब्यात घेतले. झडतीत त्यांच्याकडे १२ जिवंत काडतूसही आढळले.
रात्री १.४० वाजेपर्यंत पोलिसांनी चौकशी केल्यानंतर भांगेकडे पिस्तुलाचा परवाना असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, खंडेलवालकडे आढळलेला कट्टा आणि काडतुसाची माहिती देण्यास ते टाळाटाळ करीत होते. हा कट्टा आणि काडतूस भांगेंनी आपल्याकडे दिल्याचे खंडेलवालने सांगितले. तो भांगेकडे डेकोरेशनचे काम करतो. मात्र, खंडेलवालने त्याचा इन्कार केला. (प्रतिनिधी)

Web Title: Pistol seized from the owner of the cannon lawn