शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तुलाच्या परवान्याने पोलीस अडचणीत

By admin | Updated: August 20, 2016 02:19 IST

कुख्यात गुंडाशी सौदेबाजी करून पिस्तुल परवान्याची मिसिंग (हरविल्याची) पोच दिल्यामुळे पाचपावली पोलीस ठाण्यातील मंडळी अडचणीत आली आहे.

गुंडाशी सौदेबाजी : पाचपावलीतील वातावरण गरमनरेश डोंगरे ल्ल नागपूर कुख्यात गुंडाशी सौदेबाजी करून पिस्तुल परवान्याची मिसिंग (हरविल्याची) पोच दिल्यामुळे पाचपावली पोलीस ठाण्यातील मंडळी अडचणीत आली आहे. पोलीस उपायुक्तांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याने ठाण्यातील सौदेबाजात खळबळ निर्माण झाली आहे. कामठीचा हा गुंड गुन्हेगारी वर्तुळासोबतच पोलिसांमध्येही सेटिंगबाज म्हणून ओळखला जातो. मोठमोठे गुन्हे करूनही पोलीस मित्रांशी असलेल्या सेटिंगचा फायदा घेत तो स्वत:ला गुन्ह्याच्या कारवाईपासून दूर ठेवतो. दोन महिन्यांपूर्वी पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांना त्याच्याकडे पिस्तुल असल्याची कुणकुण लागली. त्यामुळे या गुंडाची चौकशी सुरू झाली. त्याचा परवाना तपासण्यात आला. तो गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथील असल्याचे कळाल्याने बनवेगिरीचा पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे त्याच्याभोवती कारवाईचा पाश आवळण्याची तयारी झाली. उपायुक्तांनी मध्यरात्री गाठले ठाणे नागपूर : पोलीस मित्राच्या माध्यमातून ‘कडक कारवाईची’ कुणकुण लागल्याने या गुन्हेगाराने पाचपावली ठाण्यात धाव घेतली. तेथे त्याने आपला पिस्तुलाचा परवाना हरविल्याचा २० जूनला तक्रारवजा अर्ज दिला. १० नंबर पुल ते इंदोरा चौकादरम्यान परवाना हरविल्याचे सांगत अर्जाच्या झेरॉक्सवर रीतसर पोच (रिसीव्ह) घेतली. बदल्यात पोलीस मित्रांचे खिसे गरम केले. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या पोचपावतीचा भक्कम आधार घेत त्याने कोर्टात परवाना हरविल्याचे आणि आपण पाचपावली ठाण्यात तसा तक्रारवजा अर्ज दिल्याचे लेखी निवेदन सादर केले. त्याच्या या पवित्र्यामुळे कारवाईची तयारी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना जबर धक्का बसला. गुन्हेगाराने पोलिसांना मात देण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात आल्यामुळे पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांनी गुरुवारी मध्यरात्री पाचपावली ठाण्यात धाव घेतली. तेथे त्यांनी पिस्तुलाचा परवाना हरविल्याची नोंद कुणी केली अशी विचारणा केली. अडचणीत येण्याचे संकेत मिळाल्याने संबंधितांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांनी एका पोलीस उपनिरीक्षकाचे नाव पुढे केले. (प्रतिनिधी) बाहेरच्या बाहेरच सौदा विशेष म्हणजे, या उपनिरीक्षकाची काही दिवसांपूर्वीच जरीपटका ठाण्यात बदली झाली आहे. गुन्हेगाराच्या तक्रार अर्जावर पोच (मिसिंग रिपोर्टवर रिसिव्हड्) देणाऱ्याने बाहेरच्या बाहेरच सौदा केला, असेही सांगण्यात आले. पोलीस ठाण्यात तशी कोणतीही नोंद नसल्याचे सांगून २० जून आणि आजूबाजूच्या तारखांच्या नोंदीही दाखवण्यात आल्या. अभिनाशकुमार यांनी त्या नोंदीचे अवलोकन केले असून, पुढील चौकशी सुरू आहे. या एकूणच प्रकारामुळे पाचपावली ठाण्यात खळबळ निर्माण झाली आहे.