शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक श्रम मनाची संवेदना वाढवते- बी. वेंकटेसरलू

By admin | Updated: September 21, 2014 01:34 IST

अकोला येथील कृषी विद्यापीठाच्या युवा महोत्सवाला जल्लोषात सुरुवात.

अकोला : अलीकडे युवा वर्गात अनेक व्याधी वाढल्याचे दिसत असून, १८ ते २0 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये अस्थी घनता कमी होत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी शारीरिक श्रम घेतले तर व्याधी कमी होईल आणि मनाची संवेदना वाढेल. युवा महोत्सवाच्या माध्यमातून शारीरिक क्षमता वाढते आणि मनाचा विकास होतो, असे प्रतिपादन स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटेसरलू यांनी केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या डॉ. के.आर. ठाकरे सभागृहात आयोजित युवा महत्सोवाचे उद्घाटन शनिवारी डॉ. वेंकटेसरलू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते विद्यार्थ्यांना उद्देशून बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. वंदन मोहोड, प्रा. संजय कोकाटे, युवा महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.एस.के. अहेरकर, डॉ. एस.एम. टाले यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी डॉ. वेंकटसरलू यांनी डॉ. हरवीरसिंग या कृषी शास्त्रज्ञांचा उल्लेख केला. हरवीरसिंग यांची मुलगी सायना नेहवाल हिने क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळविले आहे. शारीरिक श्रमामुळे यश प्राप्त करता येते, ही प्रेरणा सायनाने आपल्यासमोर निर्माण केली आहे. यासाठी शारीरिक श्रम आणि मनाची संवेदना वृद्धिंगत करावी लागणार असल्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी युवा महोत्सव पुस्तिकेचे प्रकाशन व येथे आयोजित पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालक डॉ. बिडवे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. उ पेंद्र कुळकर्णी यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर केले. विद्यार्थी मोठय़ा सं ख्येने उपस्थित होते.