शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक सुदृढता हीच आरोग्याची किल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST

नियमित जीममध्ये वर्कआऊट करणारे अनिल शिवणकर यांच्या मते, मेंटल बॅलन्स राखण्यासाठी जीममध्ये तास-दीड तासाचा वर्कआऊट खूप फायदेशीर आहे. शरीर ...

नियमित जीममध्ये वर्कआऊट करणारे अनिल शिवणकर यांच्या मते, मेंटल बॅलन्स राखण्यासाठी जीममध्ये तास-दीड तासाचा वर्कआऊट खूप फायदेशीर आहे. शरीर फिट ठेवण्यास चांगला पर्याय आहे. यामुळे फॅट्स व काेलेस्ट्राॅल कमी करणे आणि ऊर्जा वाढविणे शक्य हाेते. त्यांनी जीमवर बंदी घालण्याच्या निर्णयाचा विराेध केला आहे. एकीकडे राेगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे असताना जीम बंद करून तरुणांची अडचण केली आहे. शहरात हजाराे लाेक जीममध्ये जातात. काही महिन्यापासून ते अनेक वर्षांपासून जीम करणारेही आहेत. अनेक महिने मेहनत केल्यानंतर त्यांनी शरीर कमावलेले असते. मात्र जीम बंद केल्याने एका झटक्यात अवस्था जैसे थे झाली आहे. साध्या व्यायामाने ती परत मिळविणे कठीण असते. दुसरीकडे सकाळी ७ च्या आत बाहेर पडण्यास मनाई असल्याने व्यायाम कधी करावा, हा प्रश्नच आहे. प्रामाणिक जीमिंग व व्यायाम करणाऱ्यांची काेंडी झाली असल्याची भावना शिवणकर यांनी व्यक्त केली.

तासाभराची वर्कआऊट लाभदायक ()

जीम ट्रेनर नीलेश नेवारे यांच्या मते, शरीर फिट आणि आराेग्य सुदृढ ठेवण्यासाठी जीम एक चांगला पर्याय आहे. जीममध्ये तासभर घाम गाळल्यास शरीरातील अधिकच्या कॅलरीज बर्न करणे शक्य हाेते व बाॅडीला आकर्षक आकार देता येते. पण त्यांनी काही नियम पाळणे गरजेचे असल्याचे सांगितले.

- सुरुवात करणाऱ्यांसाठी किमान सहा महिने ३० ते ४० मिनिटांचा वर्कआऊट याेग्य आहे.

- सहा महिन्यापासून नियमित व्यायाम करणाऱ्यांसाठी तासाभराची वर्कआऊट पुरेशी आहे.

- ३०-४० मिनिटात २०० ते २५० ग्रॅम कॅलरी जाळली जाते तर, तासाभराच्या वर्कआऊटमध्ये ५०० ग्रॅम कॅलरी बर्न हाेते.

- स्टेराॅईडसारखे रासायनिक घेण्याची अजिबात गरज नाही व घेऊही नये. गरजेप्रमाणे प्राेटीन पावडर घ्यावे. ते लाभदायकच आहे.

- दरराेज तासभर वर्कआऊट केल्यास ऊर्जा आणि राेगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत हाेते. हृदय कार्य करण्याची क्षमता वाढते.