शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त वक्तव्याविरुद्धची याचिका फेटाळली

By admin | Updated: July 24, 2014 00:54 IST

प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाचे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे प्रसारण व प्रकाशनाविरुद्ध दाखल रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर

नागपूर : प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाचे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे प्रसारण व प्रकाशनाविरुद्ध दाखल रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावली.अ‍ॅड. उदय दास्ताने यांनी ही याचिका केली होती. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांनी प्रकरण निकाली काढताना भारतीय राज्यघटनेने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असून याचिकेत काहीच गुणवत्ता नसल्याचे मत व्यक्त केले. काटजू यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरील कोणताही कार्यक्रम किंवा बातमीचे प्रसारण, पुन:प्रसारण व प्रकाशनाला प्रतिबंध करण्यात यावा, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली होती. न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाचे तीन निवृत्त सरन्यायाधीश आर. सी. लाहोटी, वाय. के. सबरवाल व के. जी. बाळकृष्णन यांनी तत्कालीन मनमोहनसिंग सरकारच्या दबावाखाली भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मद्रास उच्च न्यायालयाच्या एका अतिरिक्त न्यायाधीशाला सेवेत कायम ठेवण्यासाठी अनुचित तडजोडी केल्याचा आरोप काटजू यांनी २० जुलै रोजी एका राष्ट्रीय वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता. याशिवाय त्यांनी ‘सत्यम बृयत - जस्टीस काटजू’ या ब्लॉगवर ‘मद्रास उच्च न्यायालयात भ्रष्टाचारी न्यायमूर्ती कसे कायम राहिले’ या मथळ्याखाली लेख लिहिला आहे. मुलाखत प्रसारित होताच देशभर खळबळ माजली. अन्य वृत्तवाहिन्यांनीही यासंदर्भात बातम्या प्रसारित करायला सुरुवात केली. तज्ज्ञांना बोलावून चर्चा घडवून आणल्या गेल्या. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये बातम्या व तज्ज्ञांचे लेख प्रकाशित झाले. २२ जुलै रोजी विधीतज्ज्ञाच्या प्रतिक्रिया दाखविण्यात आल्या. तत्कालीन कायदे मंत्र्यांनीही टीव्ही वाहिन्यांवर आपले विचार व्यक्त केले. यामुळे केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायद्याच्या कलम ५ मधील तरतूदींचे उल्लंघन झाल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला होता. काटजू यांच्या विधानामुळे न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांच्या मनातील न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलीन झाली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर व प्रेस कौन्सिल आॅफ इंडिया यांना हा विषय सक्षमपणे हाताळता आला नाही. त्यांना या कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवता आले नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. अ‍ॅड. उदय दास्ताने यांनी स्वत:ची बाजू मांडली, तर प्रतिवादींतर्फे एएसजीआय रोहित देव यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)