शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत वाढताहेत ‘पर्शियन कॅट लव्हर’

By admin | Updated: August 8, 2015 02:53 IST

मांजर पाळण्याचा छंद अनेक वर्षांपासून अनेक जण जोपासतात. काळाच्या ओघात आता हा छंद ग्लोबल झाला आहे.

आज ‘वर्ल्ड कॅट डे’ : ५० हजारापर्यंतच्या मांजरी पाळतात शौकिनदयानंद पाईकराव  नागपूरमांजर पाळण्याचा छंद अनेक वर्षांपासून अनेक जण जोपासतात. काळाच्या ओघात आता हा छंद ग्लोबल झाला आहे. होय, देशी मांजर पाळणारे नागपूरकर आता विदेशातून मांजर बोलवित आहेत. यात ‘पर्शियन कॅट’ला विशेष मागणी असून विदेशी मांजर घरात आणण्यासाठी उपराजधानीतील शौकिनांनी ६ ते ५० हजार रुपये खर्च केले आहेत. आजमितीस नागपुरात तब्बल ७० ते ७५ पर्शियन कॅट पाळण्यात येत आहेत.पाळीव मांजरीला घरातील सदस्यासारखी वागणूक मिळते. त्यांची खाण्यापिण्याची भांडी, झोपण्याची जागा ठरविलेली असते. लहान मुलांना या मांजरीबद्दल विशेष आकर्षण असल्यामुळे अनेकजण घरी मांजर पाळतात. अलिकडच्या काळात विदेशातील मांजर पाळण्याची पद्धत नागपुरात रूढ होत आहे. सध्या नागपुरात देशी ६०० पाळीव मांजरी, १५०० मोकाट फिरणाऱ्या मांजरी तर विदेशातून बोलावलेल्या ७० ते ७५ मांजरी असल्याची माहिती छत्रपतीनगर येथील शिवहरी अपार्टमेंटमधील डॉग, कॅट, बर्ड क्लिनिकचे व्हेटरनरी सर्जन हेमंत जैन यांनी दिली. जगातील एकूण मांजरांपैकी ५३ टक्के मांजर पाळीव आहेत. घरी राहत असल्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, वागणुकीत बदल घडून येतो. या उलट पाळीव नसलेली देशीमांजर आक्रमक असते. पाळीव मांजरांमध्ये जगभरात लठ्ठपणाचे प्रमाण वाढत असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. अमेरिकेतील ५८ टक्के मांजरी लठ्ठ आहेत. इतर देशातील मांजरीमध्ये ३० ते ४० टक्के लठ्ठपणा आढळतो. लठ्ठपणामुळे मांजरांना मधुमेह, त्वचेचे आजार, हाड, सांधेदुखी, मूत्रविकार जडून त्यांचे वयोमान कमी होते. साधारणत: एक मांजर १२ ते १५ वर्षाचे आयुष्य जगते. परंतु अमेरिकेत ३८ वर्षे मांजर जगल्याचा विक्रम असल्याची माहिती डॉ. हेमंत जैन यांनी दिली. मांजर आपल्या घराभोवती ५०० मिटरची जागा तयार करते. या जागेत तिचा वावर राहतो. मांजरीला ३० दात असतात. परंतु तिला आंबट, गोड, तिखट अशी चव कळत नाही. माणसापेक्षा पाच पट अधिक हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड मांजरीच्या पोटात असते. यामुळे मांस पचविणे त्यांना सहज शक्य होते. मांजर स्वत: आपले केस चाटत असते. यामुळे तिचे केस पोटात जाऊन त्याचा हेअरबॉल तयार होऊन मांजरीचा मृत्यू होऊ शकतो. त्यासाठी मांजरीला नियमित ब्रश करणे, सलाद, कॅट फूड आणि हेअरबॉल होऊ नये म्हणून हेअरबॉल रिमुव्हल फॉर्म्युला देणे गरजेचे असते. याशिवाय मांजरीच्या विष्ठेपासून महिलांना आजार जडत असल्यामुळे दर महिन्यात मांजरीला जंताचे औषध देणे गरजेचे ठरते. मांजरासाठी ३ ते ५ हजार रुपयांचे ‘कॅट फूड’ विकत घेणारे शौकिनही नागपुरात असून सर्वजण नियमित आपल्या लाडक्या ‘कॅट’ची आवर्जून देखभाल करतात. मांजर देते स्वच्छतेला महत्त्वपाळीव मांजर घरात कधीच घाण करीत नाही. आपण राहत असलेली जागा आणि आपले शरीर नेहमी स्वच्छ ठेवते. शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी एक मांजर दिवसातील ३० टक्के वेळ खर्च करते. मांजरीने बाहेर विष्ठा केली तरीसुद्धा ती पायाने माती उकरून त्यावर माती टाकते.विषबाधेमुळे सर्वाधिक मांजरींचा मृत्यूजगातील सर्वाधिक मांजरींचा मृत्यू विषबाधेमुळे होतो. विष टाकून मारलेले उंदीर मांजर खात असल्यामुळे त्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय जगात सर्वात अधिक नागरिकांचा मृत्यूही मांजर चावल्यामुळे झाल्याची नोंद आहे. त्यासाठी मांजरांना नियमित रॅबीज, हायड्रोफोबियाची लस देणे गरजेचे असते.