शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारांना स्थायी समितीचा धक्का

By admin | Updated: January 5, 2017 02:05 IST

शहरात सर्वत्र सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. परंतु बाजूच्या रस्त्याला जोडणारा भाग समतल न करता तसाच सोडला जात आहे.

नादुुरुस्त सिमेंट रस्त्यांची दुरुस्ती करणार नागपूर : शहरात सर्वत्र सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. परंतु बाजूच्या रस्त्याला जोडणारा भाग समतल न करता तसाच सोडला जात आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेसचे नगरसेवक सुरेश जग्याशी यांनी हा मुद्दा उपस्थित केला. या रस्त्यांची दुरुस्ती संबंधित कंत्राटारांकडून करण्याचे आश्वासन देण्यात आले. सिमेंट रस्ते की अपघाताला निमंत्रण, अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. स्थायी समितीच्या बैठकीत या वृत्ताची गंभीर दखल घेण्यात आली. शहरातील सिमेंट रस्त्यांची कामे नागरिकांच्या सुविधेसाठी केली जात आहेत की, अपघाताला निमंत्रण देण्यासाठी असा प्रश्न जग्याशी यांनी उपस्थित केला. मॉडेल मिल ते गणेशपेठ दरम्यानच्या सिमेंट रस्त्याचे काम युनिटी इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीने केले आहे. परंतु दोन रस्त्यांची जोडणी करण्याचे काम आमचे नसल्याचे कंपनीकडून सांगितले जात आहे. निविदातील अटी व शर्तीत त्रुटी ठेवण्याला जबाबदार कोण असा जाब विचारून संबंधित रस्ता समतल करण्याची जबाबदारी कंत्राटदारांची असल्याची जाणीव करून देण्यात आली. स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त यांनी याची दखल घेत मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांना बोलावून विचारणा केली. त्यांनी अर्धवट कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तीन दिवसात ही कामे संबंधित कंत्राटदारांकडून पूर्ण केली जातील, अशी ग्वाही देबडवार यांनी बैठकीत दिली.(प्रतिनिधी)