शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
5
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
6
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
7
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
8
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
9
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
10
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
11
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
12
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
15
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
16
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
17
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
18
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
19
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
20
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
Daily Top 2Weekly Top 5

लोकांना विचार करण्यापासून रोखले जातेय

By admin | Updated: May 9, 2014 02:20 IST

लेखनाची वैचारिक बैठकच नष्ट होत असेल तर ती गंभीर आणि चिंतेची बाब असून, अविवेकी लोकांची जमात वाढत चालल्याचे आणि विचारवंतांची जात संपत चालल्याचे ते लक्षण आहे

नागपूर : लेखनाची वैचारिक बैठकच नष्ट होत असेल तर ती गंभीर आणि चिंतेची बाब असून, अविवेकी लोकांची जमात वाढत चालल्याचे आणि विचारवंतांची जात संपत चालल्याचे ते लक्षण आहे. विचारच संपत चालल्याची प्रक्रिया वेगवान होत असल्याचेही ते लक्षण आहे. असा वैचारिकदृष्ट्या कुपोषित समाज लोकशाहीसाठी गंभीर धोका निर्माण करीत आहे, असा विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रा. शैलेंद्र लेंडे यांनी व्यक्त केला. मराठीतील वैचारिक लेखनाचे काय झाले? या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.
प्रगतिशील लेखक संघ आणि धरमपेठ राजाराम वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. यशवंत मनोहर तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सुनीती देव, डॉ. इंद्रजित ओरके उपस्थित होते. हा परिसंवाद राजाराम वाचनालय, धरमपेठ येथे पार पडला. डॉ. सुनीती देव म्हणाल्या, मराठीतील सर्व वाड्मय प्रकार आणि कलांचा पाया वैचारिक बाजूंनी समृद्ध आहे. यासंदर्भातली अनेक उदाहरणे त्यांनी दिली.
विचार करायला प्रवृत्त करते ते वैचारिक लेखन, अशी वैचारिकतेची व्याख्या त्यांनी केली.
डॉ. इंद्रजित ओरके म्हणाले, मराठीला वैचारिक लेखनाची समृद्ध परंपरा आहे. ही परंपरा परिवर्तनवादी, प्रबोधनकारी, मार्क्‍सवादी, समाजवादी, हिंदुत्ववादी यांच्यात विखुरली आहे. पण विशिष्ट धर्माधिष्ठित बाबींच्या प्रभावाखाली मराठी लेखनाने ही परंपरा पंगू केल्याचे आता जाणवते आहे. त्यामुळेच प्रागतिक विचारांच्या हाती राजसत्ता येत नाही.
यासाठी नव्या वैचारिक प्रबोधनाची नितांत गरज आता निर्माण झाली आहे. साहित्य संस्थांचे कार्यही फारसे आशादायी नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
डॉ. यशवंत मनोहर म्हणाले, मराठी भाषा समृद्ध व्हायची असेल तर सध्याची स्थिती बदलून मराठीत वैचारिक आणि सैद्धांतिक लेखन मजबुतीने झाले पाहिजे. वैचारिक ग्रंथांची निर्मिती न होणे ही चिंतेची बाब आहे. विचारवंतांना पचविण्याची सवय समाजाला त्यासाठी लागली पाहिजे.
विचारच करता न येणे हा लोकांचा खरा प्रश्न आहे. भारतातली तरुण पिढी हा विचार करू शकते पण तो केला जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संचालन प्रसेनजित गायकवाड यांनी तर आभार प्रकाश दुलेवाले यांनी मानले. (प्रतिनिधी)